Karan Johar Team Lokshahi
मनोरंजन

करण जोहरची हात जोडून विनंती....असं काय घडलं असावं...

शुटिंग दरम्यान करण जोहर सोबत घडल्याचं करणने सांगितले

Published by : Team Lokshahi

बॉलिवूडच्या नामांकित निर्मात्यांबद्दल बोलायचं झालं तर करण जोहर (Karan Johar) हे नाव लगेच आपल्याला लक्षात येतं. असाच एक किस्सा शुटिंग दरम्यान करण जोहर सोबत घडल्याचं करणने एका शोमध्ये सांगितले आहे.

अस काय घडल असाव त्यादरम्यान करण जोहरसोबत, जेणेकरून करणवर काही लोकांना विनंती करण्याची वेळ आली होती. साहजिकच असे काही प्रश्न आपल्या मनात निर्माण झाले असतील.

इजिप्तमध्ये (Egypt) करणच्या चित्रपटाचं शुटिंग चालू असताना त्या दरम्यानचा हा प्रसंग होता. तो चित्रपट म्हणजेच शाहरुख खान (Shah Rukh Khan) व काजोल (Kajol) यांचा 'कभी खुंशी कभी गम'. या चित्रपटातील 'सूरज हुआ मद्धम' या गाण्याची शूटिंग चालू असताना करण जोहर व त्याची टीम अशा ठिकाणी होते की शूटिंग दरम्यान त्यांना कुठलीही अडचण यायला नको.

परंतु शुटिंग चालू असतानाच अचानक कमीत कमी 20 लोक करणच्या दिशेने येत होते. एका हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंग लोकेशनसाठी ते आले होते. अगदी जवळ जवळ येताच त्यांनी कॅमेरे (Camera) काढून व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला होता. प्लिज असं करू नका मी या चित्रपटाचा दिग्दर्शक ((Director) आहे असं म्हणत त्यांना कॅमेरा खाली करण्यास मला विनंती करावी लागल्याचं करणने सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू