Karan Johar Team Lokshahi
मनोरंजन

करण जोहरचा 'कॉफी विथ करण' हा शो बंद होणार, कारण...

पोस्ट पाहून त्याच्या चाहत्यावर्गाला धक्का

Published by : shamal ghanekar

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) अनेक शोचे सुत्रसंचालन करताना आपण पाहिले आहे. तसेच त्याचा 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) हा शो सध्याच्या घडीला खूप चर्चेत आहे. 'कॉफी विथ करण'चा पहिला एपिसोड हा 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता. कॉफी विथ करण या शोमध्ये कलाकारांशी वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारणे आणि त्यांच्याशी संवाद साधला जातो. पण मात्र आता कॉफी विथ करण हा शो बंद केला जाणार असल्याचे खुद्द करण जोहरने सांगितले आहे.

करण जोहरने त्याच्या इंटाग्राम आणि ट्विटरवर (twitter) एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये करण जोहर म्हणाला की, हॅलो , 'कॉफी विथ करण'चे हे 6 पर्व (6 seasons) आहे. हे पर्व माझ्या आणि आपल्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. या शोने प्रत्येकाच्या आयुष्यावर काही ना काही प्रभाव टाकला आहे. पॉप कलचरच्या इतिहासामध्ये कुठेतरी एक ठराविक जागा निर्माण केली. पण मला सांगताना फार दु:ख होते की कॉफी विथ करण आता परत प्रसारित होणार नाही आहे. असे करण जोहरने त्याच्या शेअर केलेल्या ट्विटरवर पोस्टमध्ये लिहिले आहे.

करणची ही पोस्ट पाहून त्याच्या चाहत्यावर्गाला धक्का बसला आहे. करणच्या या पोस्टवर (Post) कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अनेकांनीही दु:ख व्यक्त केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा