मनोरंजन

Kareena Kapoor : करीना कपूर खान तिसऱ्यांदा गरोदर? बेबी बंपचा फोटो होतोय व्हायरल

अभिनेत्री करिना कपूर खान हिने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांच्या मनावर चांगलेच राज्य केलं आहे. करिना कपूर खान सोशल मिडियावर जास्त सक्रिय आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अभिनेत्री करिना कपूर खान ( Kareena Kapoor Khan) हिने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांच्या मनावर चांगलेच राज्य केलं आहे. करिना कपूर खान सोशल मिडियावर जास्त सक्रिय आहे. सध्या करीना कपूर खान लंडनमध्ये कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. करीनाने सोशल मिडियावर एक फोटो शेअर केला आहे. पती सैफ अली खान, मुलं तैमुर आणि जेह यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटो सोबत करिनाचा एक खास फोटो खूप जास्त व्हायरल होत आहे. ज्यामुळे तिचे चाहते देखील गोंधळले आहे. या फोटोमध्ये करीनाचा बेबी बंप दिसत आहे. या फोटोवरून करीना पुन्हा एकदा गरोदर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहेत.

करीना ( Kareena Kapoor Khan) खरंच गरोदर असल्याचा अंदाज चाहते लावताना दिसत आहेत. जवळपास सर्वच फोटोमध्ये करीना कुठेतरी मागे उभी असलेली किंवा सैल कपडे घातलेली किंवा पोट लपवताना दिसत आहे.

या फोटोमध्ये ब्लॅक टँक टॉपमध्ये करीना कपूरचा बेबी बंप दिसत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. त्यामुळे करीना तिसऱ्यांदा गरोदर असल्याचं बोललं जात आहे. सोशल मीडियावर कमेंट करत अनेकांनी हा प्रश्न केला आहे. सोशल मीडियावर करीना ( Kareena Kapoor Khan) पुन्हा एकदा गरोदार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा