Karisma Kapoor Team Lokshahi
मनोरंजन

Karisma Kapoor Bday : करिश्मा कपूर या अभिनेत्यांच्या प्रेमात पडली, तरीही खरे प्रेम मिळाले नाही

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा आज म्हणजेच 25 जूनला तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

Published by : shweta walge

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा (Karisma Kapoor) आज म्हणजेच 25 जूनला तिचा वाढदिवस साजरा करत आहे. वयाच्या १७ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या करिश्मा कपूरने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. कपूर घराण्यातील ती पहिली मुलगी होती जी फिल्मी दुनियेत आली. तिच्या चित्रपटांसोबतच करिश्मा कपूर तिच्या प्रेमप्रकरणांमुळेही चर्चेत असते.

( करिश्मा कपूर-अजय देवगण )

करिश्मा कपूर आणि अजय देवगण (Ajay Devgn) यांच्या अफेअरची जोरदार चर्चा होती. करिश्मा कपूरचे पहिले नाव अजय देवगणसोबत जोडले गेले. दोघांनी जिगर या चित्रपटात काम केले आणि दोघांमधील प्रेम वाढू लागले. मात्र, नंतर दोघे वेगळे झाले.

करिश्मा कपूर-गोविंदा

करिश्मा कपूर आणि गोविंदा (Govinda) यांच्या जोडीला चांगलीच पसंती मिळाली होती. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यादरम्यान गोविंदा आणि करिश्मा कपूरचे अफेअर असल्याची बातमी आली होती. यानंतर दोघांमध्ये अंतर निर्माण झाले आणि वेगळे झाले.

करिश्मा कपूर-सलमान खान

करिश्मा कपूर आणि सलमान खान (Salman Khan) यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. करिश्मा कपूरचेही नाव सलमान खानसोबतही जोडले गेले होते. मात्र, दोघांनी अफेअरबद्दल काहीही बोलले नाही.

करिश्मा कपूर-अभिषेक बच्चन

करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते. दोघांनी लग्न करायचं ठरवलं पण करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न होऊ शकले नाही.

करिश्मा कपूर संजय कपूर

करिश्मा कपूरने 2003 मध्ये बिझनेसमन संजय कपूरसोबत (Sanjay Kapoor) लग्न केले. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मात्र, हे लग्न फार काळ टिकले नाही. करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा 2016 मध्ये घटस्फोट (Divorce) झाला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली