बॉलिवुड (Bollywood) अभिनेत्री करिश्मा कपूरची (Karishma Kapoor) जादू आजही कायम आहे. आता करिश्मा कपूरने जाहिरातीमधून वेळेला 30 वर्ष मागे केले आहे. करिश्मा कपूरने क्रेडच्या जाहिरातेमधून हि कमाल केली आहे. म्हणजेच या नवीन जाहिरातीत करिश्मा कपूरने 80-90 च्या दशकातील प्रसिद्ध निरमा जाहीरात पुन्हा तयार केली आहे.
क्रेडने करिश्मा कपूरसोबत निरमा सुपर डिटर्जंटसाठी 90 च्या दशकातील प्रसिद्ध जाहिरात पुन्हा तयार केली आहे.
निरमाच्या मूळ जाहिरातीत रामायणातील सीता दीपिका चिखलिया (Deepika Chikhalia) दिसली होती. त्या जाहिरामध्ये त्या पांढऱ्या रंगाची साडी घालुन एका दुकानात जाताना दाखवले होते तसेच करिश्मा कपूरही पांढऱ्या रंगाची साडी घालुन क्रेड बाउंटीच्या बद्दल बोलताना दिसत आहे. करिश्मा कपूरने आपल्या या जाहिरातीला इंन्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे. या जाहिरातीला पाहुन यूजर्सना (users) 90 च्या दशकाची आठवण आली आहे.
ही CRED जाहिरात निरमाच्या 1989 च्या जाहिरातीला थ्रोबॅक (Throwback) आहे. अगदी निरमाच्या जाहिरातीप्रमाणे ती फ्रेम बाय फ्रेम आणि लाईन बाय लाईन बनवण्यात आली आहे. करिश्मा कपूरच्या या जाहिरातीवर चाहते सतत कमेंट (Comments) करत आहेत. गायिका रेखा भारद्वाजने 'मला त्या काळात परत नेले' अशी प्रतिक्रिया दिली. या जाहिरातीमुळे पुन्हा एकदा 90 च्या दशकातील वातावरण तयार झाले.