Bhool bhulaiyaa 2 Lokshahi team
मनोरंजन

Bhool Bhulaiyaa 2 Trailer: 'मोंजोलिका परत आलीये...'कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2'चा ट्रेलर रिलीज

कॉमेडी आणि हॉररचा जबरदस्त तडका असलेला ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Published by : Rajshree Shilare

कार्तिक आर्यन (Kartik Aryan) स्टारर 'भूल भुलैया 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलमध्ये कॉमेडी आणि हॉररचा जबरदस्त तडका पाहायला मिळत आहे.अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) भुलभुलैय्याच्या पहिल्या भागानं प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. त्यात त्याच्या भूमिकेबरोबरच विद्या बालननं (Vidya Balan) केलेल्या अभिनयानं तो चित्रपट वेगळ्याच उंचीवर गेला होता.

15 वर्षानंतर पुन्हा या घरात मोंजोलिकाचे भूत परत येताना दाखवले आहे. यावेळी ते कियारा अडवाणीच्या (Kiara Advani) शरीरात प्रवेश करेल असे ट्रेलरवरून लक्षात येते. ट्रेलवरून (Bhool Bhulaiyaa 2 trailer) प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकात आणखी वाढली आहे. येत्या 20 मे रोजी हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे.त्याच्याशिवाय कियारा अडवाणी(kiara advani) आणि तब्बु (Tabu) या मुख्य भूमिकेत चित्रपटात आहेत.

'भूल भुलैया २' चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बझ्मी (Anees Bazmi) यांनी केले आहे. या चित्रपटाचे संवाद फरहाद सामजी (Farhad Samaji ) आणि आकाश कौशिक (Akash Kaushik) यांनी संयुक्तपणे लिहिले आहेत. २००७ मध्ये रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या 'भूल भुलैया' या सुपरहिट चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. हा चित्रपट भूषण कुमार(Bhushan Kumar) , कृष्ण कुमार (Krishna Kumar), मुराद खेतानी(Murad Khetani) आणि अंजुम खेतानी(Anjum Khetani) यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Bhool bhulaiyaa 2 trailer

ट्रेलरची सुरुवात भूल भुलैयामधील प्रसिद्ध गाणं 'आमी जे तुम्हारो’ने होताना होते. त्यानंतर चित्रपटाती अनेक घटनाक्रमांचा उलगडा आणि पात्रांची ओळख होते. कार्तिक आर्यनचा जबरदस्त लूक पाहण्यासारखा आहे.अभिनेता राजपाल यादव(Rajpal Yadav) आणि संजय मिश्रा(Sanjay mishra) यांच्या कॉमेडीची झलकही पाहायला मिळाली आहे. याशिवाय चित्रपटात परेश रावल(Paresh Rawal),असरानी(Asrani), मनोज जोशी(Manoj Joshi) आणि अंगद बेदी (Angad Bedi) देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Tabu

चित्रपटात तब्बू(tabu) मंजुलीकाच्या रहस्स्याचा उलगडा करताना दिसत आहे. तर ट्रेलरच्या शेवटी कियारा अडवाणीच्या अंगात मंजुलीकाने प्रवेश केल्याचे लक्षात येते. त्यानंतर ट्रेलमध्ये एका ठिकाणी कार्तिक आर्यनचाही डबल रोल पाहालाय मिळाला आहे. हॉरर (horror)आणि कॉमेडी(comedy) असलेला हा चित्रपट प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल अशी अपेक्षा आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मराठीसाठी भांडणाऱ्यांना गुंड म्हणत असतील तर आम्ही गुंड आहोत - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Family Member Vijayi Melava : सहकुटुंब सहपरिवार..; ठाकरे बंधूंचे कुटुंब एकाच व्यासपीठावर

Latest Marathi News Update live : व्यावसायिक सुशील केडियाने मागितली माफी

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया