Kartik & kiara Lokshahi Team
मनोरंजन

भूल भुलैय्यासाठी कार्तिकसह इतर कलाकारांनी घेतली एवढी फिस

'भूल भुलैय्या 2' ची बॉक्स ऑफिसवर 55 कोटींहून अधिक कमाई

Published by : prashantpawar1

बॉलिवूडचा स्टायलिश स्टार म्हणून नामांकित असणारा कार्तिक आर्यन(Kartik Aaryan) आणि कियारा अडवाणी(Kiara Adwani) स्टारर 'भूल भुलैया 2' हा चित्रपट नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. 65 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'भूल भुलैया 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 55 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 'भूल भुलैया 2' हा चित्रपट निर्माता अनीस बज्मी(Anis Bajmi) यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात कार्तिक आणि कियारासोबतच तब्बू आणि राजपाल यादव यांच्या अभिनयाचं देखील खूप कौतुक होत आहे. आता प्रश्न इथे देखील उपस्थित होतो की या चित्रपटातील काही कलाकारांनी स्टारकास्टसाठी किती फिस घेतली असावी. तर आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.समुद्रकिनाऱ्यावर केलं बिकीनी फोटोशूट

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता कार्तिक आर्यनला 15 कोटी रुपये मिळाले आहेत. त्याचबरोबर कार्तिक सोबत मुख्य भूमिकेत काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी(kiara adwani)ला देखील या चित्रपटासाठी 4 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. या चित्रपटात तब्बू आणि राजपाल यादवही महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार तब्बूला तिच्या भूमिकेसाठी 2 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर राजपाल यादवला 1.25 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. चित्रपटातील राजपाल यादवची कॉमेडी पाहण्यासारखी आहे. संजय मिश्रा आणि अमर उपाध्याय चित्रपटातील इतर पात्रांमध्ये बघायला मिळतात.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा