Admin
मनोरंजन

kartiki gaikwad : कार्तिकी गायकवाडच्या लहान भावाने वडिलांना भेट दिली मर्सिडीज गाडी

‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या शोच्या माध्यमातून घराघरात पोहटलेली आणि लोकप्रिय झालेली गायिका कार्तिकी गायकवाड. कार्तिकी ही कायमच तिच्या आवाजाने प्रेक्षकांच्या चर्चेत असते. मात्र आता कार्तिकी नाही तर तिचा लहान भाऊ कौस्तुभ गायकवाड हा आता चांगलाच चर्चेत आला आहे. नुकतंच कार्तिकीने तिच्या लहान भावाचे कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या शोच्या माध्यमातून घराघरात पोहटलेली आणि लोकप्रिय झालेली गायिका कार्तिकी गायकवाड(Kartiki Gaikwad) . कार्तिकी ही कायमच तिच्या आवाजाने प्रेक्षकांच्या चर्चेत असते. मात्र आता कार्तिकी नाही तर तिचा लहान भाऊ कौस्तुभ गायकवाड हा आता चांगलाच चर्चेत आला आहे. नुकतंच कार्तिकीने तिच्या लहान भावाचे कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

कार्तिकीचा लहान भाऊ कौस्तुभ गायकवाड हा देखील तिच्याप्रमाणे उत्कृष्ट गायक आहे. कार्तिकीचा लहान भाऊ कौस्तुभने त्यांचे वडील गायक व संगीतकार पंडित कल्याणजी गायकवाड यांना मर्सिडीज गाडी भेट म्हणून दिली आहे. याचा एक व्हिडीओ कार्तिकीने शेअर केला आहे. कार्तिकीने ही पोस्ट शेअर करत “वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी माझ्या कौस्तुभ दादाने बाबांना Mercedes भेट दिली. खूप खूप शुभेच्छा”,असे कॅप्शन दिलं आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर अनेक कलाकारांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

कार्तिकीने शेअर केलेल्या या व्हिडीओत कौस्तुभ हा एका फॉर्मवर सही करताना दिसत आहे. त्यानंतर त्याचे वडील हे गाडीच्या शो रुममध्ये येताना दिसत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."