Karwa Chauth Team Lokshahi
मनोरंजन

Karwa Chauth: मौनी रॉयपासून शिल्पा शेट्टीपर्यंत अभिनेत्रींनी करवा चौथला लावली नवऱ्याच्या नावाची मेहंदी

आज देशभरात करवा चौथचा सण साजरा केला जात आहे.

Published by : shweta walge

आज देशभरात करवा चौथचा सण साजरा केला जात आहे. बॉलिवूड ते टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्री देखील करवा चौथ मोठ्या उत्साहाने साजरा करतात. आज छोट्या पडद्याच्या अभिनेत्रींपासून ते मोठ्या पडद्यावरच्या अभिनेत्रींपर्यंत करवा चौथच्या दिवशी नवऱ्याच्या नावाची मेहंदी लावली आहे. ज्याचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जातात.

टीव्हीपासून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री मौनी रॉय हिचा हा पहिलाच करवा चौथ आहे. अभिनेत्रीने आज तिचा नवरा म्हणजेच सूरज नांबियारच्या नावाची मेहंदी लावली आहे आणि तिच्या इंस्टाग्रामवरून सुंदर फोटो शेअर केले.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीही दरवर्षी करवा चौथ उत्साहात साजरी करते. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा स्टोरीमधून मेहंदी लावतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या पायाला आणि हाताला मेहंदी लावताना दिसत आहे.

टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्यने नोव्हेंबर २०२१ मध्ये नौदल अधिकारी राहुल शर्माशी लग्न केले. हा तीचा पहिला करवा चौथही आहे. अभिनेत्रीने खूप सुंदर मेहंदी लावली आहे आणि तिच्या हातात तिच्या पती राहुलचे नाव R या मोठ्या अक्षरात लिहिले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा