मनोरंजन

'‘कठपुतली’चा ट्रेलर रिलीज, अक्षय कुमार दिसणार सीरियल किलरच्या शोधात

अक्षय कुमार लवकरच एका नव्या अवतारात दिसणार आहे. अक्षय कुमार एका गंभीर पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. हे पात्र त्याच्या आगामी 'कठपुतली' चित्रपटातील आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अक्षय कुमार लवकरच एका नव्या अवतारात दिसणार आहे. अक्षय कुमार एका गंभीर पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. हे पात्र त्याच्या आगामी 'कठपुतली' चित्रपटातील आहे. 'कठपुतली' चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला असून हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Disney + Hotstar वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयची दमदार व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहे. मात्र, हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळेल अशी अपेक्षा आहे.

कठपुतली हा चित्रपट अक्षयच्या इतर चित्रपटांपेक्षा खूप वेगळा आहे. आपल्या विनोदाने हसवणारा अक्षय कुमार यावेळी गंभीर भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहता यात बराच सस्पेन्स असल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार एका सीरियल किलरचा शोध घेताना दिसणार आहे.

या चित्रपटात अभिनेत्री रकुल प्रीत सिंहची झलकही दिसली आहे. हा चित्रपट २ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. पूजा एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट खऱ्या आयुष्यावर आधारित थ्रिलर आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा