Katrina Kaif  Team Lokshahi
मनोरंजन

Katrina Kaif चा शाळकरी मुलांसोबत डान्स, अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल

कतरिना कैफचा हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे आणि आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

Published by : shweta walge

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्याशी संबंधित अपडेट्स शेअर करत असते. त्याचबरोबर कतरिना कैफचे फॅन पेजही तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. तीचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ती शालेय विद्यार्थ्यांसोबत डान्स करताना दिसत आहे. कतरिना कैफचा हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे आणि आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

कतरिना कैफच्या फॅन पेजवरून तिचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कतरिना कैफ तामिळनाडूच्या मदुराई येथील माउंटन व्ह्यू स्कूलच्या मुलांसोबत डान्स करताना दिसत आहे. कतरिना कैफ साऊथच्या 'बीस्ट' सिनेमातील 'मलम पिठा पिठा दे' गाण्यावर मुलांसोबत डान्स करताना दिसत आहे. तिने फ्लोरल कुर्त्यासोबत मॅचिंग पलाझो घातला आहे. विना मेकअप लुक आणि खुल्या केसांमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. कतरिना कैफचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक तिची खूप प्रशंसा करत आहेत.

कतरिना कैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची 'सूर्यवंशी' चित्रपटात दिसली होती. अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 2021 साली प्रदर्शित झाला होता. सध्या ती दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या 'मेरी ख्रिसमस' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत विजय सेतुपती आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये रिलीज होणाऱ्या 'फोनभूत' या चित्रपटात ती इशान खट्टरसोबत दिसणार आहे. ती सलमान खान आणि इमरान हाश्मीसोबत 'टायगर 3' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २०२३ च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Sandeep Deshpande : 'आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका....मेहता बिहता नी...'; संदीप देशपांडेंनी पुन्हा ठणकावलं, मराठी विरूद्ध गुजराती वाद उफाळला

Raj Thackeray - Uddhav Thackeray : 'ठाकरे साहेब सभा झाल्यावर फक्त आदेश द्या...'; 5 जूलैच्या विजयी मेळाव्यानिमित्त वरळीत बॅनरबाजी

Hollywood Walk Of Fame : दीपिका पदुकोण नव्हे, तर 'हे' भारतीय कलाकार होते 'हॉलीवूड वॉक ऑफ फेम'चे पहिले मानकरी