Katrina & Vicky Team Lokshahi
मनोरंजन

Katrina Kaif : कतरिना बद्दल चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण....

अनेक चाहत्यांनी असा अंदाज लावला की कदाचित अभिनेत्री गर्भवती आहे.

Published by : prashantpawar1

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) हिच्या बद्दल सध्या अफवा उडत आहेत की ती प्रेग्नंट आहे. आणि त्यामुळेच ती सध्या लाइमलाइटपासून दूर आहे. कतरिना करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसली नाही किंवा ती इतर कोणत्याही पार्टी किंवा विमानतळावर दिसली नाही. त्याचबरोबर कतरिना सध्या सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसल्याचं दिसतं.

अनेक चाहत्यांनी असा अंदाज लावला की कदाचित अभिनेत्री गर्भवती (Pregnant) आहे. चाहत्यांचे म्हणणे आहे की कदाचित ती आणि विकी कौशल लवकरच पहिल्या मुलाचे पालक होणार आहेत. त्याचबरोबर एका चाहत्याने सांगितलं की 16 जुलै रोजी तिच्या वाढदिवशी कतरिना तिच्या गरोदरपणाची बातमी जाहीर करू शकते.

कॅतरिना आणि विकी यांनी मागील वर्षी 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानच्या सिक्स सेन्स फोर्टमध्ये (Six Sense Fort) लग्नगाठ बांधली. दोघेही 2019 पासून एकमेकांना डेट करत होते. कामाच्या आघाडीवर कतरिना लवकरच सलमान खानसोबत 'टायगर 3' या चित्रपटात दिसणार आहे. या व्यतिरिक्त ती सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टरसोबत 'फोन भूत'मध्ये दिसणार आहे. दुसरीकडे विक्कीबद्दल बोलायचे झाले तर सध्या तो सारा अली खानसोबत त्याचा आगामी चित्रपट 'प्रॉडक्शन नंबर 25' ची शूटिंग करत आहे. याशिवाय विकी लवकरच 'गोविंदा नाम मेरा', 'द ग्रेट इंडियन फॅमिली' आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या पुढील अनटाइटल्ड चित्रपटात देखील दिसणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा