Katrina Kaif Team Lokshahi
मनोरंजन

Katrina Kaif : करण जोहरच्या शोसाठी कतरिना कैफने निवडला इतका महागडा पोशाख

कतरिना लवकरच 'कॉफी विथ करण' मध्ये तिचे फोन भूत सहकलाकार सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरसोबत दिसणार आहे.

Published by : Team Lokshahi

कतरिना कैफ (Katrina Kaif) तिच्या कॅज्युअल पण स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते. कतरिना लवकरच 'कॉफी विथ करण' मध्ये तिचे फोन भूत सहकलाकार सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरसोबत दिसणार आहे. तिने स्वत:चा एक फोटो पोस्ट करून बातमीची पुष्टी केली आणि त्याला कॅप्शन दिले, "कोणी कॉफीसाठी?"

कतरिना कैफच्या आउटफिटची किंमत

कतरिनाला तिचे चाहते तिला शोमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत, तर फोटोमधिल तिचा आउटफिट देखील चर्चेचा विषय ठरला आहे. कारण फोटोंमध्ये तिने काळ्या आणि पांढर्‍या रंगाचा स्ट्रीप केलेला शर्ट घातलेला दिसत आहे. या ड्रेसची किंमत समोर आली आहे जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कतरिनाने परिधान केलेल्या ड्रेसवर मोन्स असे लेबल आहे आणि त्याची किंमत सुमारे USD 1,390 म्हणजेच 1,10,000 रुपये आहे. साधेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या कतरिनाने तिचा मेकअप कमीत कमी ठेवला. तिने या ड्रेससोबत कानात हुप्सची क्लासिक जोडी घातली होती.

कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर त्यांच्या आगामी 'फोन भूत' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कॉफी विथ करणमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट ४ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. हा चित्रपट गुरमीत सिंग यांनी दिग्दर्शित केला आहे आणि रविशंकरन आणि जसविंदर सिंग बाथ यांनी लिहिलेला आहे, एक्सेल एंटरटेनमेंट निर्मित, फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या नेतृत्वाखाली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा