मनोरंजन

Vicky-Katrina Wedding Photo | विकी कौशल आणि कतरिना कैफ अडकले लग्नबंधनात;फोटो आले समोर

Published by : Lokshahi News

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ अखेर लग्नबंधनात अडकले आहे.राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट येथे विवाह सोहळा पार पडला. या लग्न सोहळ्याचे फोटो आता समोर आले आहे.

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ च्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. अत्यंत गुप्त पद्धतीने, कोणतीही गोष्ट जाहीर न करता, अगदी कडक नियम पाळून हा विवाहसोहळा पार पडला. पंजाबी पद्धतीने हा विवाह पार पडला आहे. पाच मजल्यांचा केक एका इटालियन शेफकडून बनवून घेण्यात आला असून भारतीय आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही पद्धतींचे स्वादिष्ट पदार्थ पाहुण्यांसाठी ठेवण्यात आले आहेत. या दोघांच्याही चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसून येत आहे.

या दोघांनीही लग्नाचे सर्व विधी अत्यंत गुप्तता पाळून केले. यांचं लग्न लागल्याची माहिती जरी मिळाली असली तरी अद्याप या लग्नाचे फोटो मिळालेले नाहीत. मात्र सोशल मीडियावर काही जणांनी हे फोटो शेअर केले आहेत. या दोघांच्या लग्नाचेच हे फोटो असल्याचा दावा केला जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा