मनोरंजन

Katrina Kaif: कतरिनाचा सासूबाईंसोबतचा तो व्हिडीओ आणि चाहत्यांकडून कौतुक; Video

विकी कौशलच्या सॅम बहादुर सिनेमा अवघ्या काहीच तासांमध्ये सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाला रिलीजआधीपासुनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहयला मिळत आहे.

Published by : shweta walge

विकी कौशलच्या सॅम बहादुर सिनेमा अवघ्या काहीच तासांमध्ये सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाला रिलीजआधीपासुनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहयला मिळत आहे. यातच या सिनेमाचं काल मुंबईत खास स्क्रीनींग झालं. त्यावेळी विकीचं संपूर्ण कुटुंब त्याचा सिनेमा पाहायला उपस्थित होतं. त्यावेळी स्क्रीनींगसाठी आपल्या कुंटुबिंयासोबत आलेल्या कतरिनाचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

काल मुंबईतील जुहू येथे झालेल्या स्पेशल स्क्रीनींगवेळी विक्की कौशलचे संपूर्ण कुटुंब 'सॅम बहादुर' पाहायला आले होते. चित्रपट संपल्यानंतर कतरिना तिचे सासरे, सासू आणि विकीच्या भावासह थिएटरमधून बाहेर आले. कौशल कुटुंबाला एकत्र पाहून पापाराझींना तो खास क्षण कॅमेऱ्यात कैद करायचा होता. विकीची आई थोडी गोंधळली होती. त्यावेळी कतरिना सासूची काळजी घेताना दिसली. तिने त्यांच्या हाताला धरुन त्यांना बाहेर आणले. आणि मिठी मारत त्यांना निरोप दिला.

‘सॅम बहादुर’ चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले असून त्यांनी भवानी अय्यर आणि शंतनू श्रीवास्तव यांच्या समवेत या चित्रपटाचे लेखन देखील केले आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांनी ‘आरएसव्हीपी मूव्हीज’च्या बॅनरखाली करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा