मनोरंजन

Kavyanjali - Sakhi Savali : अंजलीचं स्थळ कोणाशी जुळणार - सुजित की प्रितम?

काव्या आणि अंजली या बहिणींच्या जोडीला चांगलीच पसंती मिळते आहे.

Published by : Siddhi Naringrekar

'काव्यांजली - सखी सावली' मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.

काव्या आणि अंजली या बहिणींच्या जोडीला चांगलीच पसंती मिळते आहे. या दोघी बहिणींची जीवनशैली जरी अगदी विरुद्ध असली तरी विविध आव्हानातून त्या एकमेकींना साथ देतात.

आतापर्यंत आपण पाहिलं, काव्याने अंजलीसाठी स्थळ बघितला आहे ही गोष्ट काव्या अंजलीला सांगते.

अंजलीचं प्रितमसोबत नाही तर सुजीतसोबत लग्न ठरतंय ही गोष्ट अंजलीला माहित नसते. काव्याने तिला स्थळाबद्दल सांगितल्यावर तिला वाटते तीच लग्न प्रितमसोबत होणार आहे आणि म्हणून ती होकार देते.

हे ऐकून काव्यादेखील आनंदी होते आणि गोष्टी पुढे नेते. काव्या घरी येऊन मिनाक्षी आणि निरंजनला सांगते की उद्या अंजली आणि सुजीतच्या लग्नाची बोलणी करायची आहे पण मिनाक्षीला हे मान्य नसतं.

अंजली जेव्हा कार्यक्रमासाठी तयार होऊन बाहेर येते तेव्हा तिला समोर सुजीत आणि प्रितम दोघेही दिसतात आणि दोघांना बघून ती गोंधळते.

जेव्हा तिला कळेल की तिचं लग्न प्रितम नाही तर सुजीतसोबत ठरतंय तेव्हा अंजलीच्या मनावर काय परिणाम होईल? हे सत्य कळल्यावर ती कशी रिऍक्ट करेल? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा