मनोरंजन

Amitabh Bachchan Birthday : अमिताभ बच्चन यांना वाढदिवसानिमित्त 'KBC 15'ने दिलं खास सरप्राईज; पाहा व्हिडिओ...

बिग बी 11 ऑक्टोबरला 81 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. KBC 15 तर्फे त्यांच्या वाढदिवसाचं खास आयोजन करण्यात आलं आहे.

Published by : Team Lokshahi

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 81 व्या वर्षात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत. आता 'कौन बनेगा करोडपती 15' (Kaun Banega Crorepati 15) तर्फे त्यांना वाढदिवसाची खास भेट देण्यात आली आहे. बिग बी 11 ऑक्टोबरला 81 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. KBC 15 तर्फे त्यांच्या वाढदिवसाचं खास आयोजन करण्यात आलं आहे.

अमिताभ बच्चन नुकतेच 'केबीसी'च्या सेटवर पोहोचले त्यावेळी त्यांना एक सरप्राइज मिळालं. हे खास सरप्राइज पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. निर्मात्यांनी 'कौन बनेगा करोडपती 15'च्या आगामी भागाचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये बिग बींना अश्रू अनावर झालेले दिसत आहेत.

KBC च्या मंचावर अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस सर्वात खास पद्धतीने साजरा केला जातो. सोनी टीव्हीच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन आपल्या सीटवरून उठतात, स्वतःसाठी टिश्यू घेतात आणि भरलेल्या डोळ्यातील अश्रू पुसतात.

या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन म्हणतात, 'तुम्ही मला अजून किती रडवणार?. मी आजवर लोकांना टिश्यू देतो आणि आज मला टिश्यू घेण्याची वेळ आली आहे."

'प्रोजेक्ट के' या आगामी चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबतच प्रभास आणि दीपिका पादुकोण हे कलाकार देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत. केबीसी सारख्या कार्यक्रमांसोबतच बिग बी हे वेगवेगळ्या चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात. काही दिवसांपूर्वी त्यांंचे ब्रह्मास्त्र आणि गुडबाय हे चित्रपट रिलीज झाले. तसेच अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. 'सेक्शन 84' या चित्रपटात देखील अमिताभ बच्चन काम करणार आहेत, असं म्हटलं जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : काल एक गद्दार काल बोलला 'जय गुजरात' - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "मराठी शिकणारे शिक्षणमंत्री इंग्रजीमध्ये शिकणारा मुख्यमंत्री..." राज ठाकरेंचा नाव न घेता टोला

Raj Thackeray Live : 'जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलंय'; राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Raj-Uddhav Thackeray Family Member Vijayi Melava : सहकुटुंब सहपरिवार..; ठाकरे बंधूंचे कुटुंब एकाच व्यासपीठावर