मनोरंजन

KGF 2 मधील हिरोचे डबिंग केलंय या मराठी अभिनेत्याने

Published by : Saurabh Gondhali

कन्नड अभिनेता यश याचा ‘केजीएफ-2’ (KGF 2)हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घालताना दिसत आहे. हिंदीमध्ये या चित्रपटाने जवळपास दोनशे कोटी रु’पयांचा व्यवसाय केला आहे. जगभरामध्ये हा चित्रपट प्रचंड व्यवसाय करतच आहे.के जी एफ चॅप्टर वन हा चित्रपट देखील प्रचंड चालला होता. आता केजीएफ टू (KGF 2)हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करत आहे. यामध्ये यशची भूमिका आहे. संजय दत्त, रविना टंडन यांच्या देखील भूमिका या चित्रपटात आहेत. काही महिन्यांपूर्वी आलेला पुष्पा द राईज हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर गाजला.

सचिन गोळे हा मुंबईच्या गोरगाव येथील मोतीलाल नगर 2 या झोपडपट्टीत राहतो. एका छोट्याशा स्टुडिओमध्ये तो आपले काम करून उदरनिर्वाह करत असतो. त्याचा स्वतःचा स्टुडिओ देखील नाही. त्याच्या मित्राच्या स्टुडिओमध्ये तो काम करत असल्याचे सांगण्यात येते. साधारणतः 2008 च्या सुमारास तो बॉलीवूडमध्ये आला.मात्र, त्याला येथे खूप मोठे स्ट्रगल करावे लागले. सुरुवातीच्या काळात त्याला अभिनेता व्हायचे होते. मात्र, त्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही. 2010 मध्ये त्याच्या वडिलांचं नि’धन झालं होतं. त्यानंतर अभिनेता म्हणून आपण काम करू शकत नाही, हे त्याला लक्षात आले. त्यानंतर त्याला एका मित्राने डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करण्याचा सल्ला दिला.

गणेश दिवेकर हे खूप मोठे डबिंग आर्टिस्ट आहेत. त्यासाठी त्यांनी सचिन याला मदत केली. त्या काळामध्ये सचिन याने छोटी मोठी कामे केली. अनेक बँकांमध्ये देखील ते काम करायचा. डबिंग आर्टिस्ट होण्यासाठी त्याने अनेक ठिकाणी उंबरठे झिजवले. काही ठिकाणी त्याला यश मिळाले, तर काही ठिकाणी अपयश मिळाले.मात्र, शेवटी यश मिळाले. एक दिवस अंधेरी मध्ये एका दक्षिणेतील चित्रपटाचे डबिंग सुरू होते. तिथे नशीब आजमावण्याचे ठरवले आणि त्याला पहिल्यांदा संधी मिळाली. धनुष याच्या मेरी ताकत है मेरा फैसला या चित्रपटातून त्याला ब्रेक मिळाला. हळूहळू त्याने अनेक चित्रपटासाठी डबिंग देखील केले. आज तो आघाडीचा डबिंग स्टार बनला आहे.

के जी एफ वन आणि 2 या चित्रपटातील यश म्हणजेच रॉकी भाईच्या भूमिकेला सचिन याने आवाज दिला आहे. के जी एफ चॅप्टर 1 हिंदी डब करायचा म्हटल्यावर त्याने आधीच डब केलेले सिनेमे पाहिले होते. त्यामुळे त्याला हे अफाट यश मिळाले आहे. यश याच्यासोबत सचिन याची चांगली केमिस्ट्री देखील जमल्याचे पाहायला मिळते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद