KGF 2  Team Lokshahi
मनोरंजन

KGF 2 चित्रपट लवकरच मोबाईलवर येणार

आता लवकरच तुम्ही हा सिनेमा या Amazon Prime Video प्लॅटफॉर्मवर देखील बघू शकणार आहात.

Published by : Team Lokshahi

साऊथ सुपरस्टार यशच्या (Yash) KGF 2 या सिनेमाला रिलीज होऊन एक आठवडा पूर्ण झाला असून देखील सिनेमा अजूनही अनेक ठिकाणी हाऊसफुल आहे. जगभरातून या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

केजीएफ २ समोर बॉक्स ऑफिसवर (Box office) इतर कोणताही सिनेमा टिकू शकत नाही. या वीकेंडला सिनेमा १००० चा आकडा पार करणार अशी अपेक्षा केली जात आहे. शहरी भागातील लोक तर थिएटरला जाऊन सिनेमा बघत आहेत, पण ग्रामीण भागातील लोक हा सिनेमा OTT वर बघण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र आता लवकरच तुम्ही हा सिनेमा OTT वर देखील बघू शकणार आहात.

OTT प्लॅटफॉर्मवर कधी येणार KGF 2?

Amazon Prime Video ने केजीएफ २ चे डिजिटल स्ट्रीमिंगचे राइट्स विकत घेतले आहेत. १४ एप्रिलला रिलीज झालेला हा सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदी, कन्नड, तमिळ आणि मल्याळम भाषेत (languages) बघता येणार आहे. २७ मे रोजी हा सिनेमा Amazon Prime Video वर रिलीज होणार आहे. त्यानंतर तुम्ही आरामात घरी बसून मोबाइल (mobile) किंवा लॅपटॉपवर हा सिनेमा बघू शकता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा