KGF 2 movie Team Lokshahi
मनोरंजन

KGF स्टार यशला 'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबत काम करायची इच्छा

या बॉलिवूड अभिनेत्रीसोबत यशला काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

Published by : Team Lokshahi

'केजीएफ चॅप्टर २' प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रॉकी (Rocky) भाईच्या दमदार अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकली असून अभिनेता यशच्या (yash) अभिनयाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे.

'केजीएफ २' हा तेलुगू चित्रपट आहे परंतु त्याला हिंदीमध्ये डब करण्यात आलं आहे. मात्र आता चाहते यशाला हिंदी चित्रपटांमध्येही पाहण्यास उत्सुक आहेत. यशला अनेक मुलाखतीमध्ये (Interview) बॉलिवूड डेब्यूबाबत प्रश्न विचारण्यात आला असता, त्याने प्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्रीसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

मुलाखतीत रॅपिड फायर राउंडमध्ये त्यानं एका प्रश्नाचं उत्तर देताना बॉलिवूड अभिनेत्रीसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या राउंडमध्ये यशला, 'कोणत्या अभिनेत्रीसोबत बॉलिवूड पदार्पण करण्याची इच्छा आहे?' असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेता यशनं अभिनेत्री दीपिका पदुकोणचं नाव घेतलं होतं. दीपिका पदुकोण (Deepika Padukone) बेंगळुरूची असल्यानं मला तिच्यासोबत काम करायची इच्छा असल्याचे यश म्हणाला होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : हार्बर मार्ग 15-20, मध्य रेल्वे 20-25 तर पश्चिम रेल्वे 30-35 मिनिटांनी उशिराने धावत आहे

Latest Marathi News Update live : मुंबईला दिवसभर मुसळधार पावसाने झोडपलं

आजचा सुविचार

Marathwada Rain Update : मराठवाड्यात पावसाचा कहर; 11 जणांचा बळी, जनजीवन विस्कळीत, पिकांचे प्रचंड नुकसान