मनोरंजन

Khushboo Tawde: 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेला निरोप देत, खुशबू तावडे अनुभवणार दुसऱ्यांदा आईपण

खुशबू तावडेने नुकताच या मालिकेतून निरोप घेतला आहे. तर तिच्या जागी आता नवीव कलाकार ही भूमिका साकारताना दिसणार आहे.

Published by : Team Lokshahi

खुशबू तावडे आणि संग्राम साळवी ही जोडी सध्या फार चर्चेत येताना दिसत आहे. दोघही त्यांच्या कामात व्यस्त आहेत, नुकतेच 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत संग्रामची धमाकेदार एंट्री झालेली पाहायला मिळत आहे आणि त्याचसोबत तो साकारत असलेली भूमिका देखील प्रेक्षकांच्या आवडीची होत आहे. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम देखील मिळत आहे. तर खुशबू तावडे सुद्धा 'झी मराठी' वाहिनीवरील 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेत तिची उमाची भूमिका साकारताना दिसत होती. मात्र खुशबू तावडेने नुकताच या मालिकेतून निरोप घेतला आहे. तर तिच्या जागी आता नवीव कलाकार ही भूमिका साकारताना दिसणार आहे. उमाची भूमिका आता पल्लवी वैद्य साकारताना दिसणार आहे.

खुशबू तावडेने 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेला निरोप घेण्यामागचं कारण असं की, खुशबू तावडेने एक गोड बातमी दिली आहे. तिच्या घरी आता दुसऱ्यांदा पाळणा हलणार असून ती आणि संग्राम साळवी हे दोघे आता दुसऱ्यांदा आई वडिल होण्याचा आनंद अनुभवणार आहेत. खुशबू तावडे आणि संग्राम साळवी यांची लग्नगाठ 2018 मध्ये बांधली गेली. लग्नाच्या 3 वर्षानंतर ते पहिल्यांदा आई वडिल झाले आणि त्यांना राघव नावाचा गोंडस मुलगा झाला. यानंतर आता पुन्हा या दोघांनी चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.

यादरम्यान त्यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यावर कॅप्शनला "आमच्या कुटुंबासाठी थोडे अधिक प्रेम जोडत आहे" असे लिहले आहे. तर ऑक्टोबर 2024 हा महिना कॅप्शनमध्ये जोडला आहे. तसेच त्यांच्या या पोस्टद्वारे खुशबू तावडे आणि संग्राम साळवी या दोघांवर ही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर अभिज्ञा भावे, रश्मी अनपट, रुचिका कदम, ऋतुजा बागवे, तितीक्षा तावडे, अपूर्वा गोरे, प्रसाद जवादे, शिवानी रांगोळे, धनश्री काडगांवकर, अश्विनी कासार, पल्लवी कदम, गौरव घाटणेकर, अनघा अतुल या कलाकारांकडून ही त्यांच्या या गोड बातमीसाठी अभिनंदन केले जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?