Varun Dhawan, Kiara Advani Team Lokshahi
मनोरंजन

Varun Dhawan : कियाराने लगावला वरूनला टोला...

वरुण म्हणाला की शूटिंगपूर्वी माझे अन् कियारामध्ये २-३ वेळा भांडण झाले होते."

Published by : prashantpawar1

बॉलीवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhavan) 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून डेब्यू करत आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्याचा नुकताच 'जुग जुग जिओ' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटात तो पहिल्यांदाच अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Adwani) हिच्या सोबत स्क्रिनवर पहायला मिळणार आहे. आणि त्यांच्या या जोडीला प्रेक्षकांनीही उत्तम पसंती मिळाली आहे. मात्र चित्रपटाच्या पडद्यावर या दोघांची जोडी अप्रतिम असली तरी देखील चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये अनेक भांडण झाले आहेत. याचा खुलासा खुद्द वरुण धवनने केला असून यामागचे कारणही दिले आहे.

वरुण धवनने दिलेल्या एकाला मुलाखतीत खुलासा केला आहे की चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका फाईट सीनदरम्यान तो आणि कियारामध्ये वाद झाला होता. हा किस्सा आठवताना वरुण म्हणाला की, या सीनच्या शूटिंगपूर्वी माझे आणि कियारामध्ये २-३ वेळा भांडण झाले होते." अभिनेत्याने असेही सांगितले की त्यांच्यातील वाद इतका गंभीर झाला होता की दिग्दर्शक राज मेहता (Raj Mehata) यांना आम्हाला शांत करावे लागले. वरुण धवनने मुलाखतीत पुढे सांगितले की, कियाराने त्याला अंधभक्त देखील म्हटलेलं आहे.

वरून म्हणाला मी जे करतोय ते माझ्या कुटुंबियांसाठी करावे लागेल. कारण मला तेच शिकवले गेले आहे. कियारा म्हटली की तुझे वडील आणि भाऊही असाच विचार करतात. जर मला असे वाटत असेल की मला माझ्या कुटुंबासाठी कमावण्याची गरज आहे. तर मी आंधळा भक्त का आहे हेच मी माझ्या आई-वडिलांकडून शिकलो आहे असं देखील वरूनने स्पष्टपणे सांगितलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य