Kichcha Sudeep Team Lokshahi
मनोरंजन

Kichcha Sudeep : संघर्षाच्या दिवसांत कपड्यांच्या दुकानात केलं काम, आता आहे कोट्यावधीचा मालक...

सुदीप किच्चाला हवे असते तर स्वतःचे आयुष्य सहज जगता आले असते. पण तरीही त्यांनी आपल्या स्वप्नांसाठी स्ट्रगल निवडलं.

Published by : prashantpawar1

कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीप (Kichcha Sudeep) काही दिवसांपूर्वी चर्चेचं कारण ठरला होता. त्याचे खरे नाव संजीव सुदीप आहे. परंतु, सर्व जण त्याला किच्चा सुदीप नावाने ओळखतात. संजीव सुदीप ते किच्चा सुदीप असं त्यांच नाव पडण्याची कहाणी देखील खूप रंजक आहे.

2001 मध्ये जेव्हा त्याचा दुसरा चित्रपट 'हुचा' रिलीज झाला. तेव्हा लोकांना तो खूप आवडला आणि या चित्रपटातील त्याच्या पात्राचे नाव किच्चा होते. तोपर्यंत लोकांना त्याचे खरे नाव माहित नव्हते. म्हणून लोक त्याला किच्चा म्हणू लागले. त्यानंतर जेव्हा त्यांचे खरे नाव सर्वांसमोर आले तेव्हापासून ते किच्चा सुदीप म्हणून ओळखले जाऊ लागले. जर तुम्ही तेरे नाम हा बॉलीवूड चित्रपट पाहिला असेल तर हा चित्रपट 'हुचा' या दक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे.

सुदीपचे वडील व्यापारी आहेत. त्याला हवे असते तर आयुष्य सहज जगता आले असते. पण तरीही त्याने आपल्या स्वप्नांसाठी स्ट्रगल निवडलं. सुदीपने स्ट्रगलच्या काळात वडिलांकडून अजिबात पैसे घेतले नाहीत. तो संपूर्ण महिना केवळ 500 रुपयांमध्ये घालवायचा. उदरनिर्वाहासाठी तो कपड्याच्या दुकानात काम करायचा. फोटोशूट करायचा आणि पैशासाठी क्रिकेट खेळायचा. त्यामुळे त्याच्या रोजच्या जेवणाचा जुगाड व्हायचा.

'हुचा' हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतरही त्यांना चित्रपटसृष्टीत खूप संघर्ष करावा लागला. काही वर्षांनी त्याने किच्चा, स्वाती मिठू, हुबळी असे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले. किच्चा सुदीपने बॉलीवूडमध्ये 'फोन 2' आणि 'रक्त चरित्र 2' सारखे चित्रपट करून एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. सातत्याने सुपरहिट चित्रपट दिल्याने किच्चा सुदीप हा फोर्ब्स 100 सेलिब्रिटींच्या यादीत समाविष्ट होणारा पहिला कन्नड स्टार आहे.

किच्चा सुदीपला स्वयंपाकाची आवड आहे. जेव्हा घरात पार्टी असते तेव्हा फक्त किच्चा सुदीप पाहुण्यांसाठी जेवण बनवतो. 125 कोटींची संपत्ती असलेल्या किचा सुदीपकडे अनेक गाड्यांचे कलेक्शन आहेत. पण, त्याची आवडती कार मर्सिडीज बेंझ आहे. जुलैमध्ये प्रदर्शित झालेला किच्चा सुदीपचा विक्रांत रोना हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात