मनोरंजन

किंग खानच्या 'जवान' चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच केली रेकॉर्डब्रेक कमाई!

शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. आता पुन्हा एकदा शाहरुखचा आगामी चित्रपट 'जवान' हा बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे.

Published by : Team Lokshahi

शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. आता पुन्हा एकदा शाहरुखचा आगामी चित्रपट 'जवान' हा बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. अँटली कुमार दिग्दर्शित 'जवान' हा बॉलीवूडमधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. शाहरुख खान यावेळी पुन्हा एकदा अ‍ॅडव्हान्स थ्रिलर चित्रपटाद्वारे पडद्यावर आग लावण्यासाठी येत आहे. दरम्यान आता 'जवान चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगचे आकडे चकित करण्यासारखे समोर आले आहेत. 'जवान'च्या पहिल्या दिवशीच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगने हे सिद्ध केले आहे की, या चित्रपटाने चाहत्यांना किती वेड लावले आहे. या चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंग ही 1 सप्टेंबरला सुरू झाली. 'जवान'ची अँडव्हान्स बुकिंग सुरू होताच चित्रपटाची तिकिटे खूप वेगाने विकली गेली.

अ‍ॅडव्हान्स बुकिंग : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने पहिल्या 24 तासांत सर्वाधिक प्री-सेल्सची नोंद केली आहे. शाहरुख खान स्टारर 'जवान'ने आगाऊ बुकिंगमध्येही धुमाकूळ घातला आहे. जवान ने सुमारे 24 तासात 305 हजार तिकिटांच्या विक्रीसह 10.10 कोटीचा टप्पा ओलांडला आहे. पीव्हीआर (PVR), आयनोक्स (INOX) आणि सिनेपोलिस ( Cinepolis) मध्ये सुमारे 1,65,000 तिकिटे विकली आहेत, जो पहिल्या 24 तासामधीला रेकॉर्ड आहे. यासह जवान ने पीआयसीमधील 117 हजार तिकिटांमध्ये 'पठाण'चा रेकॉर्डही तोडला आहे. आगाऊ बुकिंगमध्ये 'जवान' अशी गती चालू राहिला तर, हा चित्रपट 'बाहुबली 2' चा रेकॉर्ड मोडू शकतो.

'जवान' या तारखेला होणार रिलीज : जवान चे अ‍ॅडव्हान्स बुकिंग हिंदीतील आतापर्यंतचे सर्वाधिक अँडव्हान्स बुकिंग ठरेल. एसएस राजामौली यांच्या बाहुबली ने पहिल्या दिवशी 6,50,000 तिकीटांसह पीआयसीमध्ये सर्वाधिक तिकिटे विकण्याचा विक्रम केला होता. आता जवान हा विक्रम मोडेल असे दिसत आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खान जवान मध्ये दुहेरी भूमिकेत झळकणार आहे. जवान ची निर्मिती रेड चिलीज एंटरटेनमेंटने केली आहे. शाहरुख खान व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये नयनतारा, विजय सेतुपती, प्रियामणी आणि सान्या मल्होत्रा हे देखील कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटामध्ये दीपिका पदुकोण आणि संजय दत्त खास कॅमिओमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट 7 सप्टेंबरला हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा