मनोरंजन

किरण मानेंची फेसबुक पोस्ट चर्चेत; झुंड चित्रपटाबद्दल म्हणाले…

Published by : Team Lokshahi

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित 'झुंड' (jhund) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करतोयं. अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांनी सोशल मिडियावर या चित्रपटाबद्दलची एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेता किरण माने हे फेसबूकवर (Facebook) विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. नुकतेच किरण माने यांनी 'झुंड' चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर केली. यात त्यांनी नागराज मंजुळे आणि 'झुंड' चित्रपटाचे कौतुक केले असून त्यांनी नागराज मंजुळे यांची एक कविताही शेअर केली आहे.

किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की "…नागराज, लै लै लै वर्ष झाली. मी खाली पोस्ट केलेली तुझी, 'तुझ्या येण्याअगोदर एक पत्र' ही कविता वाचून अस्वस्थ झालो होतो. आज या कवितेचं 'महाकाव्य' करून तू मोठ्या पडद्यावरुन मांडलंस आणि अख्खा देश हलवून सोडलास. भारतीय सिनेमाच्या (Indian cinema) दिग्दर्शन, स्क्रीनप्ले संवाद लेखनाच्या सगळ्या रूढ चौकटी मोडून-तोडून तू खूप काही बदलतोस, सगळी बंधनं झुगारून देऊन तुझ्या मनातलं काहीतरी मांडतोयस…सहजपणे… 'बघाच आणि समजून घ्याच' असा आग्रह न करता ! या पिढीसाठीही आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी तू 'प्रेरणा' ठरणार आहेस. लब्यू भावा",

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा