Karan Johar, Kareena Kapoor, Aamir Khan Team Lokshahi
मनोरंजन

Koffee With Karan 7: करण जोहरचा शो या वेळेत होणार प्रसारित, तुम्हाला कधी आणि कुठे पाहता येईल?

चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा चॅट शो 'कॉफी विथ करण 7' सध्या चर्चेत आहे.

Published by : Team Lokshahi

चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा (Karan Johar) चॅट शो 'कॉफी विथ करण 7' (Koffee With Karan) सध्या चर्चेत आहे. या शोचा हा सातवा सीझन आहे. सातव्या सीझनच्या या एपिसोडमध्ये करीना कपूर (Kareena Kapoor) आणि आमिर खान (Aamir Khan) सहभागी होणार आहेत. या शोमध्ये करण जोहर आमिर खान आणि करीना कपूरच्या वैयक्तिक-व्यावसायिक जीवनाशी संबंधित अनेक मजेदार प्रश्न विचारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी चॅट शोचा एपिसोड त्याच्या नियमित वेळापत्रकाच्या आधी प्रदर्शित होणार आहे. स्वत: करण जोहरने ही माहिती दिली आहे.

'कॉफी विथ करण' हा शो डिस्ने प्लस हॉट स्टारवर (Disney+ Hotstar) दर गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होतो. यावेळी देखील शो फक्त डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित होईल, पण यावेळी हा शो उद्या मध्यरात्री प्रसारित होणार आहे. शोचा हा एपिसोड पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. त्यामुळे त्यांना जास्त वेळ थांबावे लागणार नाही.

करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे ही माहिती दिली आहे. त्याने इंस्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये करीना कपूर आणि आमिर खान दिसत आहेत. यासोबत करण जोहरने कॅप्शन लिहिले की, 'गुरुवार 12 वाजता (उद्या मध्यरात्री) डिस्ने प्लस हॉट स्टारवर 'कॉफी विथ करण'चा नवीन भाग येत आहे.

करण जोहरचा हा शो खूप पसंत केला जातआहे. या शोमध्ये आतापर्यंत रणवीर सिंग, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, सारा अली खान, अक्षय कुमार, समंथा रुथ प्रभू, विजय देवरकोंडा, अनन्या पांडे असे अनेक मोठे स्टार्स दिसले आहेत. यावेळी आमिर खान आणि करीना कपूर खानसोबत हा शो खास असणार आहे. आमिर आणि करीनाबद्दल बोलायचे झाले तर ते दोघेही सध्या त्यांच्या आगामी 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट 11ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा