Kushal Badrike  
मनोरंजन

मी पुना येईन , मी पुना येईन...! कुशल बद्रिकेच्या पोस्टनं वेधलं चाहत्यांच लक्ष

Published by : Akash Kukade

'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारा व लोकांना सगळी दु:ख विसरायला लावणारा कॉमेडी अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) ने गमतीशीर कॅप्शन देत पोस्ट शेअर केली आहे.

कुशलने इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. फोटोपेक्षा त्या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे ही पोस्ट चर्चेत आली आहे. 'मी पुना येईन , मी पुना येईन , मी पुना येईन .येताना फूड मॉलला काहीतरी खाऊन येईन..,'असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे. कुशलच्या या मजेशीर पोस्टवर चाहत्यांकडून देखील कमेंटचा वर्षाव होत आहे. तर एकाने 'लय कॉमेडी हाय तुम्ही राव', अशा शब्दांत या पोस्टचं कौतुकही केलं आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'फू बाई फू' नावाच्या विनोदी कार्यक्रमामधून कुशल प्रकाशझोतात आला होता. त्यानंतर 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात विविध भूमिका करत असताना त्यांच्या अनोख्या विनोदी शैलीमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली.

त्यानंतर कुशलने मालिकांसोबतच रंपाट, बायोस्कोप, स्लॅम बुक, बकुळा नामदेव घोटाळे अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. कुशल लवकरच 'जत्रा 2' या चित्रपटात दिसणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा