Aamir Khan
Aamir Khan Team Lokshahi
मनोरंजन

Laal Singh Chadda : माफी मागत आमिरने केली चित्रपट पाहण्याची विनंती....

Published by : prashantpawar1

सुपरस्टार आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच काही लोक त्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. यामुळे #BoycottLaalSinghCaddha या नावाने देखील ट्विटरवर अनेक दिवस ट्रेंड चालू आहे. आता नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान आमिरने पुन्हा एकदा यावर प्रतिक्रिया देत संतप्त लोकांची माफी मागितली आहे. (Laal Singh Chadda: Apologizing, Aamir requested to watch the movie....)

आमिरने यापूर्वीही दुःख व्यक्त केलं होतं
आमिरने याआधी चित्रपटावर बहिष्कार टाकल्याबद्दल दु:ख व्यक्त केलं होतं. असं देखील म्हणाला होता की मलाही या गोष्टीचं वाईट वाटतय की काही लोकांना वाटतं की मी असा व्यक्ती आहे ज्याला हा भारत आवडत नाही. काही लोक माझ्याबद्दल असा विचार करतात. खरं तर माझ्यासाठी हे फार दुर्दैवी आहे. कृपया माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका. माझा चित्रपट सर्व प्रेक्षकांना आवडेल आणि तो सर्वांनी पहावा अशीही विनंती त्याने केली.

'लालसिंग चड्ढा'वर बहिष्कार टाकण्याचे कारण

आमिर खानच्या चित्रपटावर युजर्सनी बहिष्कार टाकण्यामागे काही गोष्टींचं कारण आहे. खरं तर आमिरने काही वर्षांपूर्वी देशातील वाढत्या असहिष्णुतेवर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की देशातील वातावरण खराब आहे. आणि त्यामुळे त्यांची माजी पत्नी किरणला देश सोडायचा होता. दुसरं म्हणजे 'पीके' चित्रपटात त्याने देवाचा अपमान केला होता. आणि तिसरं कारण म्हणजेच त्याने काही वर्षांपूर्वी त्याच्या 'सत्यमेव जयते' या शोमध्ये म्हटले होते की शिवाच्या मूर्तीला दूध अर्पण करण्यापेक्षा मुलाला दूध पाजणे चांगले. यावर आता लोक म्हणतात की 'लाल सिंह चड्ढा'वर पैसे खर्च करण्याऐवजी ते गरीब मुलांना खाऊ घालतील.

पुण्यातील रेसकोर्स मैदानात PM मोदींचं मोठं विधान, म्हणाले; "देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये..."

शरद पवारांनी PM मोदींसह अमित शहांवर फुंकली 'तुतारी', म्हणाले; "जो महागाई वाढवतो, त्यांना..."

Harbour Railway: तब्बल ४ तासांनंतर हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीला थेट इशारा, साताऱ्यात म्हणाले, "मी जिवंत आहे, तोपर्यंत..."

IPL मध्ये जॅक्सने दाखवली 'विल'पॉवर! ख्रिस गेलचा दहा वर्षांपूर्वीचा 'हा' विक्रम मोडला