मनोरंजन

Oscars 2025 च्या शर्यतीतून 'लापता लेडीज' बाहेर!

'लापता लेडीज' चित्रपट 97व्या ऑस्कर शर्यतीतून बाहेर! किरण राव आणि आमिर खान यांचा हा चित्रपट शॉर्टलिस्टमध्ये समाविष्ट न झाल्याने संपूर्ण देश निराश.

Published by : shweta walge

'लापता लेडीज' हा चित्रपट 97व्या ऑस्कर पुरस्कार-2025 च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस (AMPAS) ने बुधवारी सकाळी ही घोषणा केली. "लापता लेडीज"चा ऑस्कर शॉर्टलिस्टमध्ये समावेश न होणं यामुळे फक्त किरण राव आणि आमिर खानच नाही, तर संपूर्ण देश निराश झाला आहे. कारण सर्वांनाच या चित्रपटाच्या सेलेक्शनसाठी खूप उत्साह होता. दरम्यान खरंतर, भारताशी संबंधीत असलेला दुसरा चित्रपट संतोष आहे. खरंतर हा यूकेमधील चित्रपट आहे आणि त्यात भारतीय अभिनेत्री असून हा शॉर्टलिस्ट यादीत सिलेक्ट झाला आहे.

"लापता लेडीज" या चित्रपटाला सप्टेंबरमध्ये 97व्या अकादमी पुरस्कारांसाठी अधिकृत एंट्री म्हणून निवडले गेले होते. असमिया चित्रपट निर्माते जाह्नु बरुआ यांच्या अध्यक्षतेखालील 13 सदस्यीय निवडक कमिटीने सांगितले की, किरण रावच्या या चित्रपटाने भारतीय महिलांच्या विविधतेचे चांगले प्रदर्शन केले आहे.

"लापता लेडीज" ची कथा

"लापता लेडीज" ची कथा 2001 मध्ये स्थापन केलेल्या एका काल्पनिक राज्य, "निर्मल प्रदेश"वर आधारित आहे, जिथे दोन नवरी ट्रेनमध्ये हरवून जातात. एक नवरी तिच्या नवऱ्याबरोबर निघून जाते, तर दुसरी एकटीच स्टेशनवर राहते. त्यानंतर, एक पोलिस अधिकारी या प्रकरणाचा तपास करतो आणि अखेर दोन्ही मुली त्यांच्या-त्यांच्या ठिकाणी परत जातात. या चित्रपटात त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि त्यांचा प्रवास दाखवला आहे.

दरम्यान, किरण राव द्वारा निर्देशित या चित्रपटाची निर्मिती आमिर खान यांनी केली होती. चित्रपटात नितांशी गोयल, प्रतिभा रांता, स्पर्श श्रीवास्तव आणि रवि किशन हे महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस; डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन करुन दिल्या शुभेच्छा

Latest Marathi News Update live : आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

Kolhapur Ambabai Mandir : अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन आज बंद राहणार

Latest Marathi News Update live : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश