Lagan movie Team Lokshahi
मनोरंजन

Lagan : चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अर्जुन यशवंतराव गुजर दिग्दर्शित लगन हा चित्रपट प्रेक्षकांच्या लवकरच येणार भेटीला

Published by : Akash Kukade

अर्जुन यशवंतराव गुजर (Arjun Yashwantrao Gujar) दिग्दर्शित लगन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. जी.बी. एंटरटेनमेंट (G.B. Entertainment) निर्मित हा चित्रपट ६ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

प्रेमासाठी गरज असते ती दोन प्रेमळ मनांची. ही मने जुळली की मग प्रेमासाठी काहीही करण्याचं बळ आपोआप मिळतं. याच सामर्थ्याची आणि निरपेक्ष, तरल प्रेमाचा अनुभव देणाऱ्या लगन (Lagan) चित्रपटातून अज्या आणि नंदिनीची प्रेमकहाणी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

सुजित चैारे (Sujit Chaire) आणि श्वेता काळे (Shweta Kale) ही नवी युवा जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या जोडीसोबत स्मिता तांबे, प्रशांत तपस्वी, शुभम शिंदे,अपेक्षा चलवादे, अनिल नगरकर, रामचंद्र धुमाळ आदि कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.

चित्रपटाला साजेशी दणक दणक, सरलं, पायी फुफाटा, दचकतंय ही चारही गाणी चांगली जमून आली असून सध्या ती चांगलीच गाजत आहेत. अजय गोगावले, आदर्श शिंदे, चिन्मयी श्रीपाद, ओमकारस्वरूप बागडे, पी.शंकरम यांचा स्वर या चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. संगीत पी.शंकरम, विजय गवंडे, रोहित नागभिडे यांचे आहे.

'लगन'चे लेखन आणि दिग्दर्शन अर्जुन यशवंतराव गुजर यांनी केले आहे. भारत गुजर, बिभीषण गुजर ,कैलास गुजर, किशोर काकडे, सय्यद मुस्तफा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. छायांकन सोपान पुरंदरे आणि रणजीत माने यांचे आहे. तर पार्श्वसंगीत पी.शंकरम (P Shankaram) तर साऊंड डिझायन विकास खंदारे यांचे आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद