मनोरंजन

Lakshmikant Berde Death Anniversary : नेहमीच लक्षात राहणारा ‘लक्ष्या’

रंगभूमी, सिनेसृष्टी अशा दोन्ही ठिकाणी तसंच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे दिवंगत अभिनेते 'लक्ष्मीकांत बेर्डे' यांचा आज स्मृतीदिन.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Lakshmikant Berde Death Anniversary : रंगभूमी, सिनेसृष्टी अशा दोन्ही ठिकाणी तसंच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे दिवंगत अभिनेते 'लक्ष्मीकांत बेर्डे' यांचा आज स्मृतीदिन आहे. चला तर या अशा महान कलाकारांविषयी काही रोचक गोष्टी आपण जाणून घेऊ.

- २६ ऑक्टोबर, १९५४ रोजी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म झाला. सुरुवातीपासूनच त्यांचा ओढा अभिनयाकडे होता. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा, गिरगावातील सार्वजनिक गणेशोत्सवातून हा कलाकार चमकला.

रंगभूमीवर अभिनय करण्याआधी ते नाटकाचा पडदा ओढण्याचं काम करायचे. पडदा ओढणाऱ्या या पोऱ्याने एके दिवशी संपूर्ण पडदा कधी व्यापला ते समजलंच नाही.

- बंधू पुरुषोत्तम बेर्डे यांच्या 'टूर टूर' नाटकापासून त्यांनी आपल्या रंगभूमीवरच्या करियरला सुरुवात केली. हे त्यांचं पाहिलं नाटक प्रचंड गाजलं. त्यानंतर आलेला 'शांतेचं कार्ट चालू आहे', 'बिघडले स्वर्गाचे दार', 'कार्टी चालू आहे' या सारख्या नाटकातून लक्ष्मीकांत यांनी काम केले आहे.

- महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर या दोन्ही कंपन्यांमधून तयार झालेल्या चित्रपटात लक्ष्मीकांत हमखास असायचे. 'धुमधडाका', 'अशी ही बनवा बनवी', 'शेम टू शेम', 'धडाकेबाज', 'झपाटलेला' या सारखे चित्रपट लोकांना प्रचंड आवडले. झपाटलेला चक्क हिंदीत डब झाला.

- याच काळात लक्ष्या आणि अशोक सराफ जोडी तयार झाली. 'बाळाचे बाप ब्रम्हचारी', 'माझा छकुला', 'आयत्या घरात घरोबा' इत्यादी त्याची उदाहरणं.

- मराठीनंतर त्यांना त्या काळातील बड्या आणि नावाजलेल्या चित्रपट निर्मिती संस्थांमधून ऑफर आल्या. राजश्री प्रॉडक्शनचा 'मैंने प्यार किया', 'हम आपके हें कौन?' या यशस्वी चित्रपटांमध्ये लक्ष्यामामा दिसला. सलमानबरोबर त्यांनी 'साजन' सारखा हिट चित्रपट केला.

- लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या शिस्तीबद्दल, दिलदारपणाबद्दल, आणि विनोदाच्या टायमिंगबद्दल अनेकदा बोललं जातं. रात्री कितीही उशिरा झोप लागली तरी हा माणूस सकाळी बरोबर वेळेवर शुटींगसाठी हजर राहायचा.

- त्यांचं लग्न रुही बेर्डे यांच्याशी झालं पण ते फार काळ टिकलं नाही. त्यानंतर त्यांनी प्रिया बेर्डे यांच्याशी लग्न केलं. त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे याने 'ती सध्या काय करते' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे.

- १६ डिसेंबर, २००४ साली त्यांनी हे जग सोडलं. किडनीच्या आजाराने त्यांनी जगाची निरोप घेतला. त्यांच्या अशा अकाली मृत्यू कोणीही विचार केला नव्हता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ambadas Danve : "मी पुन्हा येईन...", विधान परिषदेतील अंबादास दानवेंचे निरोप भाषण चर्चेत

Indians Executed Abroad : 'या' देशात भारतीयांना सर्वाधिक फाशी ; निमिषा प्रिया प्रकरणानंतर आकडेवारी समोर

Israel Attack On Syria : सिरियातील लष्करी मुख्यालयावर इस्रायलचा हल्ला; तणाव वाढला

Uddhav Thackeray - Eknath Shinde : उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदेंमध्ये 'का रे दुरावा' ; एकत्रित बसणं टाळलं, शिंदेच्याही 'त्या' कृतीने वेधलं लक्ष