मनोरंजन

Sushmita Sen - Lalit Modi : ललित मोदी आणि सुष्मिता सेनचं झालं लग्न? मालदीवमध्ये पार पडला विवाह?

Published by : Siddhi Naringrekar

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी (Lalit Modi) आणि यांनी माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन (Sushmita Sen) हिच्याशी लग्न केले असल्याची माहिती समोर येत आहे. या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोघांनी मालदिवमध्ये (Maldiv) लग्न केले, अशाही चर्चा सुरु झाल्या. यानंतर स्वतः ललित मोदी यांनी लंडनहून ट्वीट करत याबाबत खुलासा केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये ललित मोदी यांनी आम्ही दोघांनी लग्न केलं नसल्याचं स्पष्टीकरण दिलं. तसेच आम्ही सध्या एकमेकांना ‘डेट’ करत आहोत, अशी कबुली दिली.

तीन वेळा रिलेशनशीपमध्ये असूनही सुष्मिता सेनने आत्तापर्यंत लग्न केलं नव्हत. सुष्मिता सेनचे वय 46 वर्ष आहे. मात्र आम्ही सध्या डेट करतोय एवढीच माहिती सुष्मिता सेन हीच्याकडून देण्यात आली आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी सुष्मिता काही दिवसांपासूर्वी रोहमनसोबत रिलेशनशिपमध्ये होती मात्र काही कारणास्तव त्यांचे ब्रेकअप झाले. रोहमन सुष्मिताच्या मुली आणि तिच्या कुटुंबाच्याही खूप जवळचा होता.

ललित मोदी यांनी देशात आयपीएलची सुरुवात केली होती. त्यांनी त्यांच्या कुटुंबीताल अनेकांना आयपीएलमध्ये पार्टनरशीपही दिली होती. त्यांनी केलेल्या कामाचा फायदा त्यांच्या नीकटवर्तीयांनाच मिळाल्याचा आक्षेप आहे. 2008 साली आय़पीएल आल्यानंतर त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि त्याचे श्रेयही ललित मोदींच्या पदरात पडले. 2005 ते 2010 त्यांच्याकडे बीसीसीआयच्या अपाध्यक्षपदाची जबाबदारी होती. 2008 ते 2010 या काळात त्यांच्याकडे आयपीएलचा कार्यभार होता. ते आयपीएलचे अध्यक्ष आणि कमिश्नर होते. 2010 साली घोटाळ्याच्या आरोपावरुन त्यांची पदावरुन उचलबांगडी करण्यात आली.

विशेष म्हणजे याआधी ललित मोदी यांनी स्वतः सुश्मिता सेनला ‘बेटर हाफ’ म्हणत तिच्यासोबतचे काही फोटो ट्वीट केले होते. त्या ट्वीटमध्ये ललित मोदी म्हणाले, “कुटुंबासोबत मालदीव, सार्दानियाच्या दौऱ्यावरुन नुकताच लंडनला परतलो. यावेळी माझी ‘बेटर हाफ’ सुश्मिता सेनही सोबत होती. अखेर नवी सुरुवात आणि नवं आयुष्य सुरू झालं आहे. माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही.” अशा आशयाचे ट्विट केलं होतं.

Shantigiri Maharaj : शांतीगिरी महाराज यांनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले...

राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्यातील मतदान

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल