यक्ष महोत्सव २३ ते २५ फेब्रुवारी २०२५ दरम्यान असणार असून हा महोत्सव दरवर्षी प्रतिष्ठित ईशा महाशिवरात्री उत्सवापूर्वी आयोजित केला जातो आणि त्यात जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या विश्वप्रसिद्ध कलाकारांचा समावेश असतो. राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक राहुल देशपांडे, कोइम्बतूर येथील ईशा योग केंद्रात संगीत, नृत्य आणि संस्कृतीने संपन्न अशा वार्षिक तीन दिवसीय यक्ष महोत्सवात गायन सादर करणार आहेत.
अलीकडेच संगीतातील योगदानासाठी लता मंगेशकर पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे चर्चेत असलेले राहुल देशपांडे यक्षच्या दुसऱ्या दिवशी आपली कला सादर करणार आहेत. या उत्सवाबद्दल बोलताना सद्गुरू म्हणाले की, "यक्ष हा आध्यात्मिक प्रयत्नांसाठी अविभाज्य असलेली स्थिरता आणि हालचाल, ध्वनी आणि शांतता साजरी करणारा एक उत्सव आहे. या संस्कृतीत - आणि या उत्सवात - आम्ही यांचा उपयोग जाणीवपूर्वक विकसित होण्यासाठी आणि कल्याणासाठी करतो."