मनोरंजन

लावणी पाहताना प्रेक्षकाचा मृत्यू; गौतमी पाटील म्हणाली, डान्स फ्लोमध्ये चूक झाली, पण...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अमोल धर्माधिकारी | पुणे : लावणी कलावंत गौतमी पाटील सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. सांगली जिल्ह्यातील बेडग गावामधील तिच्या लावणीच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले होते. तसेच, मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. अशातच गौतमी पाटील हिचे नवीन गाणे प्रदर्शित होणार असल्याने ती पुण्यात माध्यमांशी संवाद साधत होती. यात तिने अनेख खुलासे केले.

गौतमी पाटील म्हणाली की, सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहे. मी कोल्हापूरची नाही तर धुळ्याची आहे. शिंदखेडा हे माझं मूळ गाव आहे. जन्मापासूनच माझ्या वडिलांनी मला आणि आईला सोडलं. माझे वडील माझ्या आईला मारहाण करायचे. माझी आईने खूप कष्ट केले. एके दिवशी माझ्या आईचा मोठा अपघात झाला. तेव्हा तिची नोकरी गेली. तेव्हापासून मी डान्स करायचे. मग, घर सांभाळण्यासाठी मी ऑर्केस्ट्रामध्ये जाऊन काम करायचे. माझ्याबाबत खूप अफवा पसरवल्या जात आहेत. घरची परिस्थिती चांगली नव्हती म्हणून मी आधी बॅक स्टेज डान्सर म्हणून काम केले आणि त्यानंतर मी लावणीकडे वळले.

माझ्याकडून जी चूक झाली ती मी मान्य केली. डान्सच्या फ्लोमध्ये चूक झाली. पण, आज मी सगळ्यांची माफी मागते. त्या व्हिडिओ नंतर मी डान्समध्ये बदल केले आहेत. सांगलीच्या गोष्टीवरून मला वाईट वाटले. मी माझं काम केले. पण, अशी काही गोष्ट होईल मला काही माहित नव्हत. शो संपल्यावर मला कळलं की तिथल्या एका माणसाचा मृत्यू झाला, असे तिने म्हंटले आहे.

मी व्हायरल झालेले नृत्य केले. तेव्हा मी पायात घुंगरू बांधत नव्हते. पण, मला सुरेखा पुणेकर यांनी सांगितल्यानंतर मी माझं नृत्य बदलले. "अर्ध्या रात्री" या गाण्यापासून माझी सर्वत्र चर्चेस सुरुवात झाली. मी आता कुठल्याही प्रकारचे अश्लील नृत्य करत नाही, असेही गौतमीने सांगितलेे आहे.

"उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपद हिरावून घेतलं, म्हणून..." कणकवलीत नारायण राणेंच्या सभेत 'राज'गर्जना

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

टी-२० वर्ल्डकपमध्ये 'इॅम्पॅक्ट प्लेयर'चा नियम नाही, दिग्गज खेळाडू म्हणाला, "कर्णधाराची वेगळी रणनीती..."

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण