मनोरंजन

Lawrence Bishnoi Munawar Faruqui: स्टॅंडप कॉमेडियन मुनव्वर फारुकी लॉरेन्स बिश्नोईच्या रडारवर? काय आहे कारण...

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई हे नाव चर्चेत येत आहे. तर लॉरेन्स बिश्नोईच्या हिट लिस्ट उघड झाली आहे आणि त्यादरम्यान स्टॅंडप कॉमेडियन मुनव्वर फारुकी याचं नाव या लिस्टच्या टॉपला असल्याच्या चर्चांना देखील उधान आलं आहे.

Published by : Team Lokshahi

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई हे नाव चर्चेत येत आहे. तर लॉरेन्स बिश्नोईच्या हिट लिस्ट उघड झाली आहे आणि त्यादरम्यान बिग बॉस हिंदीच्या 17 व्या सीझनचा विजेता आणि स्टॅंडप कॉमेडियन मुनव्वर फारुकी याचं नाव या लिस्टच्या टॉपला असल्याच्या चर्चांना देखील उधान आलं आहे. मुनव्वर फारुकीसह या लिस्टमध्ये इतर ही प्रमुख नावांचा समावेश आहे. यासर्वाची सुरुवात बॉलिवूडचे नामवंत अभिनेते सलमान खान यांच्यापासून सुरु झाली आहे.

लॉरेन्स बिश्नोई या गँगकडून असे सांगण्यात आले आहे की, १९९८ च्या काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानचा सहभाग होता त्यामुळे सलमान खान या गँगचे प्रमुख लक्ष्य असल्याचे सांगण्यात येते. काळवीट हा प्राणी बिश्नोई समजासाठी पवित्र मानला जातो अस एनआयएच्या कागदपत्रांनुसार समोर आलं आहे. त्यामुळेच बिश्नोई गँगकडून सलमान खानला अनेकदा धमक्या देण्यात आल्या आहेत. बाबा सिद्दिकी हे सलमान खान यांच्या जवळचे आणि जिवलग मित्र असल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली आणि याची कुबूली लॉरेन्स बिश्नोई गॅंगकडून करण्यात आली आहे. मात्र आता त्यांच्या रडारवर स्टॅंडप कॉमेडियन मुनव्वर फारुकी याच नाव आहे मात्र हे नाव का आलं आहे याबद्दल जाणून घ्या...

2021मध्ये मध्य प्रदेशात आयोजित करण्यात आलेल्या एका शोमध्ये मुनव्वरनं हिंदू देवी-देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. हिंदू देवतांवरच्या त्याच्या टीकेमुळे या गँगचे सदस्य संतापले होते. त्यामुळे त्याला सप्टेंबरमध्ये दिल्लीतील एका कार्यक्रमात त्याला संपवण्याची योजनाही आखण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोईच्या गँगमधील काही लोकांनी मुनव्वरचा पाठलाग केला होता तर सप्टेंबरमध्ये मुनव्वर दिल्लीतील ज्या हॉटेलमध्ये थांबला होता तिथेच त्या गॅंगने ही आपला बंदोबस्त केला होता.

याची खबर मुनव्वरला देऊन त्याची सुरक्षा वाढवण्यात आली होती. तर आता मुनव्वरसह इतर जे लोक या लिस्टमध्ये आहेत त्यांच्या देखील सुरक्षेची काळजी घेतली जात आहे, तसेच लॉरेन्स बिश्नोईने सांगितले आहे, लॉरेन्स बिश्नोईच्या हिट लिस्टमध्ये असलेल्या लोकांपैकी मुनव्वर फारुकी हे नाव देखील टारगेटवर आहे. तर आता लॉरेन्स बिश्नोईच्या दहशतीखाली संपूर्ण बॉलिवूड आणि इतर क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री