मनोरंजन

आलिया भट्टप्रमाणेच राखी सावंतलाही लवकरच आई व्हायचे आहे, म्हणाली - लग्नाआधीच...

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते.

Published by : shweta walge

बॉलिवूडची ड्रामा क्वीन (Drama Queen) राखी सावंत (Rakhi Sawant) कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. पण आता राखीने जे सांगितले ते ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे. राखी सावंतला आई व्हायचं आहे. राखी सावंत आदिल दुर्राणीला (Adil Durrani) डेट करत आहे. अलीकडेच राखी सावंत आणि आदिल मुंबईत स्पॉट झाले होते. यादरम्यान, अभिनेत्रीने आलिया भट्टच्या (Alia Bhatt) प्रेग्नेंसीच्या बातमीवर मजेदार प्रतिक्रिया दिली. यावेळी राखीने सांगितले की, तिलाही लवकरच आई व्हायचे आहे.

मंगळवारी राखी सावंत आदिलसोबत हॉस्पिटलबाहेर स्पॉट झाली होती. यावेळी पॅपराझींनी तिच्या तब्येतीबद्दल विचारले असता तीने सांगितले की, ती पूर्णपणे बरी आहे. यादरम्यान पॅपराझींनी तिला आलिया भट्ट आई बनण्याबाबत प्रश्न विचारला. यावर राखी म्हणाली, 'मी कधी होणार आई. मलाही आई व्हायचं आहे. माझ्या आयुष्यात आनंदाची बातमी कधी येईल. याशिवाय राखी सावंत म्हणाली की, लग्नाआधीच मी आई झाली तर चालेल. गरोदरपणाची माहिती मिळताच मी दुसऱ्या दिवशी लग्न करणार आहे.

विशेष म्हणजे राखी सावंतची लव्ह लाईफ (Love Life) नेहमीच चर्चेत असते. तिने यापूर्वी २०१८ मध्ये रितेशसोबत लग्न केले होते. राखीने बिग बॉस 15 (Big Boss 15) च्या घरात तिचा पती रितेशची (Ritesh) ओळख करून दिली. तो या शोमध्ये स्पर्धक म्हणून आला होता. पण शोमधून बाहेर आल्यानंतर काही दिवसांनी दोघे वेगळे झाले. काही वेळापूर्वी राखीने रितेशवर तिचे सोशल मीडिया अकाउंट हॅक केल्याचा आरोप केला होता. रितेशनंतर, राखी सावंतच्या आयुष्यात आदिलचा प्रवेश झाला आहे,

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा