Payal Rohatgi ,Kashmira Shah Team Lokshahi
मनोरंजन

Lock Up: पायल रोहतगीने आत्महत्येचा प्रयत्न केला का? कश्मिरा शाहने सत्य सांगितले

कंगना राणौतचा रिअॅलिटी शो लॉक अप पहिल्या दिवसापासूनच चर्चेत

Published by : shweta walge

कंगना राणौतचा (Kangana Ranaut) रिअॅलिटी शो लॉक अप (Lock Up) पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. या शोने अनेक ट्विस्ट आणि टर्न पाहिले आणि आता या शोचा लवकरच फिनाले होणार आहे. त्यामुळे, नुकतेच लॉक-अपमध्ये, स्पर्धकांना स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांची काही रहस्ये सांगावी लागतील असे दाखवण्यात आले. या टास्कमध्ये पायल रोहतगीने (Payal Rohatgi) आपल्या गुपितात सांगितले होते की, तिने ४८ तास सतत दारू प्यायली आणि आत्महत्येचाही प्रयत्न केला. यामागचे कारणही तिने शोमध्ये सांगितले. यात किती खर आहे हे कोणालाच माहीत नव्हते. पण आता कश्मीरा शाह (Kashmira Shah) पायलच्या समर्थनात उतरली असून तिने या प्रकरणाची संपूर्ण हकीकत सांगितली आहे.

काश्मिर शहा यांनी पाठिंबा दिला

यानंतर कश्मिरा शाहने ट्विट करून लिहिले- 'मित्रांनो, ती खरं बोलत आहे. मी तिला भेटले आणि एका रात्री तिच्यासोबत होते. कारण तिने काही करू नये याची मला काळजी वाटत होती. मला याविषयी कधीच बोलायचे नव्हते. पण ती तिच्या मतांसाठी खोटे बोलत आहे, असा विचार तुम्ही करू नये असे मला वाटते. पायल खरे सांगत आहे.

पायलने सांगितले होते हे रहस्य

पायल रोहतगीने शोमध्ये सांगितले होते, 'तिच्या आयुष्यात एक लव्ह अँगल होता जो तिच्या आयुष्यासाठी खूप हानिकारक ठरला. तिला दारू पिण्यास भाग पाडले गेले आणि 48 तास दारू पिणे चालू ठेवले. एका क्षणी तिने आत्महत्येचाही विचार केला आणि हात कापण्याचा प्रयत्न केला. तिच्या घरातील कोणालाही याची माहिती नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा