"लोकशाही मराठी चित्र-सन्मान 2026" हा पुरस्कार सोहळा ऑक्टोबर 2024 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा गौरव करण्यासाठी आयोजित केलेला आहे. या पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडलेले असे एकूण 32 दर्जेदार चित्रपटांची निवड करण्यात आलेली आहे.
लोकशाही मराठी चित्र-सन्मान 2026' या पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपट आणि कलाकारांना सन्मानित करण्यासाठी विविध नामांकने असणार आहेत. जसं कि सर्वोत्कृष्ट चित्रपट, लोकप्रिय चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट गीत, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता अभिनेत्री आणि इतर अशी अनेक नामांकने 'लोकशाही मराठी चित्र-सन्मान 2026' मध्ये असणार आहेत. आता 'डिजिटल स्टार ऑफ द इयर'ला Vote करण्यासाठी खालील QR Code ला Scan करा. Scanner scan केल्यावर फॉर्म सुरु होईल, त्यामध्ये 'डिजिटल स्टार ऑफ द इयर'चे पर्याय दिले आहेत, त्यातील तुम्हाला आवडत असणाऱ्या 'डिजिटल स्टार ऑफ द इयर'ला vote करुन sumit चे बटन दाबून आपल्या 'डिजिटल स्टार ऑफ द इयर'ला विजयी करा.
लोकशाही मराठीच्या सोशल मिडीया साईट्सवर या बद्दलची सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही ही संधी सोडू नका आणि वोट करायला विसरु नका. विजेत्या चित्रपटांची आणि कलाकारांची नावे 26 जानेवारी 2026ला लोकशाही मराठी न्यूज चॅनेलवर प्रदर्शित होणाऱ्या 'लोकशाही मराठी चित्र-सन्मान 2026' या भव्यदिव्य सोहळ्यात घोषित केली जातील. पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही जर खरे खुरे रसिक असाल, तर ही संधी सोडू नका. कारण या पुरस्कार सोहळ्यात मायबाप रसिक प्रेक्षकच ठरवणार कोण होणार विजेता.