मनोरंजन

'बिग बॉस'मध्ये झाली प्रेमाची सुरुवात, घरातून बाहेर पडताच केले लग्न

बिग बॉस हा अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. शोच्या प्रत्येक सीझनमध्ये नवीन लोक येतात आणि नक्कीच काही लवस्टोरी पाहायला मिळत आहे.

Published by : shweta walge

बिग बॉस हा अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. शोच्या प्रत्येक सीझनमध्ये नवीन लोक येतात आणि नक्कीच काही लवस्टोरी पाहायला मिळत आहे. सध्या नवीन सीझन सुरू आहे, पण आम्ही तुम्हाला मागील सीझनमधील अशाच काही स्टार्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांची प्रेमकहाणी या घरातून सुरू झाली आणि नंतर हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले.

प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी हे देखील खूप लोकप्रिय जोडपे आहेत आणि त्यांना 'प्रविका' म्हणून ओळखले जाते. दोघेही बिग बॉस 9 मध्ये सहभागी झाले होते आणि शो दरम्यान प्रिन्सने युविकाला हृदयाच्या आकाराची रोटी बनवून प्रपोज देखील केले होते. दोघांनी 2018 मध्ये लग्न केले.

कीथ सिक्वेरा आणि रोशेल राव देखील बिग बॉस 9 मध्ये एकत्र दिसले आणि तिथूनच त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. 2018 मध्ये कीथ आणि रोशेलचे लग्न झाले आणि आजही ते दोघे सोशल मीडियावर अनेक रोमँटिक पोस्ट शेअर करतात.

टीव्ही जगतातील सर्वात रोमँटिक जोडप्यांपैकी एक, किश्वर मर्चंट आणि सुयश राय 'प्यार की ये एक कहानी' शोमध्ये पहिल्यांदा भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर त्यांची जबरदस्त केमिस्ट्री बिग बॉस 9 मध्ये पाहायला मिळाली. सुयश आणि किश्वरचे 2016 मध्ये लग्न झाले आणि 2021 मध्ये दोघेही एका लाडक्या मुलाचे पालक झाले.

बिग बॉस 10 मध्ये भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा आणि विक्रांत एकत्र दिसले होते. इतकंच नाही तर शोदरम्यान दोघेही इतके जवळ आले की विक्रांतने शोमध्ये मोनालिसाला प्रपोज केले आणि त्यानंतर नॅशनल टेलिव्हिजनवर दोघांनी लग्न केले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक