मनोरंजन

'आभाळमाया', 'वादळवाट' च्या शीर्षकगीतांचा जादूगार हरपला, गीतकार आणि पटकथाकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन

आभाळमाया', 'वादळवाट' यांसारख्या लोकप्रिय मालिकांच्या शीर्षकगीतांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं आज निधन झालं आहे. मंगेश कुलकर्णी यांनी आज, शनिवारी दुपारी १२ वाजता श्रीवर्धन येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Published by : shweta walge

आभाळमाया', 'वादळवाट' यांसारख्या लोकप्रिय मालिकांच्या शीर्षकगीतांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं आज निधन झालं आहे. मंगेश कुलकर्णी यांचे भाईंदर येथे वृद्धापकाळाने निधन झालं, वयाच्या ७६ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगेश कुलकर्णी यांनी अनेक मालिकांसाठी शीर्षक गीते, मराठी हिंदी चित्रपटांसाठी लेखनही लिहिली आहेत. मंगेश यांच्या निधनाने मालिकेच्या शीर्षक गीताचा जादूगार आणि उत्तम पटकथाकार हरपल्यासारखा आहे.

मंगेश कुलकर्णी यांच्या लेखणीतून उतरलेली 'आभाळमाया', 'वादळवाट' या मालिकांची शीर्षकगीतं आजही लोकांच्या ओढावर आहे. मंगेश कुलकर्णी हे केवळ उत्कृष्ट गीतकारच नव्हते तर त्यांनी पटकथाकार म्हणूनही काम केलं. 'लाईफ लाईन' या गाजलेल्या टीव्ही या मालिकेची पटकथा त्यांनी लिहिली होती. तर विजया मेहत यांनी या मालिकेचं दिग्दर्शन केलं होतं. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या गाजलेल्या 'येस बॉस' या सिनेमाची पटकथाही मंगेश कुलकर्णी यांनी लिहिली होती. यासोबतच ते २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आवारा पागल दीवाना' या चित्रपटाचे सहलेखकही होते.

1993 च्या लपंडाव या मराठी चित्रपटातून पदार्पण करून, त्यांनी बॉलीवूड चित्रपटांमध्ये प्रवेश केला. त्यांनी 1997 चा चित्रपट गुलाम-ए-मुस्तफा, 1999 चा चित्रपट दिल क्या करे आणि 2000 मध्ये आलेला राजा को रानी से प्यार हो गया या चित्रपटांसाठीही लेखन केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा