मनोरंजन

Madhuri Dixit New Car: माधुरीच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका महागड्या कारचा समावेश, किंमत ऐकून व्हाल थक्क

माधुरी दीक्षितच्या कार कलेक्शनमध्ये नवीन फेरारी 296 जीटीएसचा समावेश, तिच्या आलिशान कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज-मेबॅक, रेंज रोव्हर वोगसारख्या गाड्यांचा समावेश.

Published by : Prachi Nate

अभिनेत्री माधुरीकडे स्पोर्ट्स कारपासून ते मर्सिडीजपर्यंत अशा महागड्या आणि आलिशान कारचं कलेक्शन आहे. काल मकरसंक्रांत होती आणि याच मुहुर्तावर माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी त्यांच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एक लक्झरी कार अॅड केली आहे. त्यांनी नवीन फेरारी 296 जीटीएस कार घेतली आहे, या कारची किंमत 6.24 कोटी एवढी आहे.

या कारची स्टेबॅलिटी व डाउनफोर्स वाढावी यासाठी या कारमध्ये अ‍ॅक्टिव्ह स्पॉयलरसारखे अ‍ॅडव्हान्स अ‍ॅरोडायनामिक्स आहे. तसेच ड्रायव्हिंगचा अनुभव आणखी चांगला येतो. त्याचसोबत या कारमध्ये रिअर मिड-इंजिन व रियर व्हील ड्राइव्ह आहे. फेरारी 296 जीटीएसच्या आधी तिने पोर्श 911 टर्बो एस घेतली होती.

या कारची किंमत सुमारे 3.08 कोटी आहे.या कारचे फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माधुरीच्या या आलिशान कारची किंमत वाचून तुम्ही थक्क व्हाल. माधुरीकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन पाहायला मिळते. तिच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज-मेबॅक S560, रेंज रोव्हर वोग अशा अनेक महागड्या आणि आलिशान कारचा समावेश आहे.

माधुरी दीक्षितच्या नव्या कारचा रंग रोसो कोर्सा आहे. सोशल मीडियावर यादरम्यान व्हिडियो व्हायरल होत आहे, ज्यात माधुरीने निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस घातल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तर तिचे पती काळे शर्ट, काळी पँट व ब्लेझर घालून दिसत आहेत. या दोघांनी पापाराझींशी संवाद साधला व त्यानंतर ते नव्या कारमध्ये निघून गेले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा