मनोरंजन

पुन्हा एकदा रंगली पाठकबाईंच्या हातावर राणा दादाच्या नावाची मेहंदी

ध्या श्रावण सुरु आहे. आणि श्रावण म्हटलं की, मंगळागौर ही आलीच. श्रावणात लग्न झालेल्या स्त्रियांचा लाडका सण म्हणजे मंगळागौर.

Published by : Team Lokshahi

झी मराठी वरील मालिका 'तुझ्यात जीव रंगला' चांगलीच गाजली होती. या मालिकेने प्रेक्षकांच्या हृदयात जागा मिळवली. कारण होतं राणादा आणि पाठकबाई ही जोडी. या मालिकेतूनच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांना प्रसिद्धी मिळाली. ही जोडी महाराष्ट्राची खास बनली. पण ही जोडी खऱ्या आयुष्यात जेव्हा एकत्र आले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.

यानंतर ही जोडी राणादा आणि पाठकबाई लग्न बंधनात अडकले. राणा आणि अंजलीची भूमिका साकारणारे हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचे लाखो चाहते आहेत. मात्र नुकतेच अक्षयाने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या या फोटो अंजली बाई खूप सुंदर दिसत आहे. नवरी सारखं नटलेलं पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत. सध्या श्रावण सुरु आहे. आणि श्रावण म्हटलं की, मंगळागौर ही आलीच. श्रावणात लग्न झालेल्या स्त्रियांचा लाडका सण म्हणजे मंगळागौर. मंगळागौर खेळण्यासाठी स्त्रिया आनंदात एकत्र येतात आणि मंगळागौर साजरी करतात.

हार्दिक-अक्षयाने "मंगळागौर पूजन" असे कॅप्शन देत या सोहळ्यादरम्यानचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. अक्षयाने या सोहळ्यासाठी खास सोनेरी रंगाची साडी नेसली होती. हार्दिकच्या नावाची मेहंदी, सोनेरी रंगाची साडी, हातात बांगड्या असा संपूर्ण शृंगार अभिनेत्रीने केला होता. हार्दिकने बायकोच्या साडीच्या रंगाला मॅचिंग असा सदरा परिधान केला होता.

नुकतेच मंगळागौरीसाठी अक्षयाने सुंदर मेहंदीही काढली होती ज्याचे काही फोटोही तिने शेअर केले होते. गोल्डन रंगाच्या साडीत अक्षया खूपच सुंदर दिसत आहे. तर हार्दिकने देखील गोल्डन रंगाचा कुर्ता पायजमा घातला आहे. दोघांचाही जोडा लक्ष्मी नारयणासारखा दिसत असल्याचं चाहत्यांचं म्हणण आहे. फोटो शेअर करत अक्षयाने मंगळागौर पुजन… असं कॅप्शन दिलं आहे. अनेकानी अक्षयाच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने कमेंट करत लिहीलंय की, लय भारी जोडी आहे अंजली बाई राणा दादा. 'अहा' , 'नजर न लगे.. सदा रहो सुखी...' , 'खूप सुंदर जोडी' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. अशा अनेक प्रकारच्या कमेंट चाहते या दोघांच्या फोटोवर करत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा