महाराष्ट्राची हास्य जत्रा (Maharashtrachi Hasyajatra ) हा शो प्रेक्षकांच्या अत्यंत आवडीचा बनला आहे. हा कार्यक्रम घराघरात पाहिला जातो. या कार्यक्रमातील कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. याच महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमातील अभिनेता दत्तू मोरे याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे. या कार्यक्रमातून दत्तू मोरे प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो.
यातच आता दत्तू मोरे (Dattu More) याने त्याच्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. याचा फोटो त्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. दत्तू मोरे बाबा झाला असून त्याच्या पत्नीने मुलाला जन्म दिला आहे. दत्तूने बाळाची झलक त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे.
हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शन दिलं आहे की, फायनली... तो आला! वी नाऊ ऑफिशिअली हॅव अ टायनी ह्यूमन टू ब्लेम. आयुष्यातील मोठा क्षण मी सदैव कृतज्ञ आहे. आम्ही "छोटा दत्तू मोरे" चे स्वागत करतो. असे त्याने लिहिलं आहे.