Mahesh Babu Team Lokshahi
मनोरंजन

Mahesh Babu : दाक्षिणात्यसह बॉलिवूडमध्येही महेशबाबूंचा चेहरा झळकणार ?

माहेशबाबू 'पॅन इंडिया' या चित्रपटातून दक्षिण आणि हिंदी प्रेक्षकांमध्ये धमाल करणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Published by : prashantpawar1

महेश बाबू (Mahesh Babu) हा साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहेत. त्यांना साऊथ इंडस्ट्रीचा राजकुमार असं देखील म्हटलं जातं. दाक्षिणात्य सिनेप्रेक्षकांपेक्षा तो हिंदी प्रेक्षकांमध्येही खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळेच हिंदी प्रेक्षकही त्याला पडद्यावर पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक असतात. महेश बाबूंनी अद्याप तरी हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केलेलं नाही. पण लवकरच तो बाहुबली (Baahubali) दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या 'पॅन इंडिया' या चित्रपटातून दक्षिण आणि हिंदी प्रेक्षकांमध्ये धमाल करणार आहे.

सध्या महेश बाबू दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास (Trivikram Shreenivas) यांच्या SSMB 28 या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याची माहिती समोर येत आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर तो एस.एस राजामौली (S.S Rajamoli) यांच्या पॅन इंडिया चित्रपटाच्या शूटिंगची तयारी सुरू करणार आहे. त्यासाठी महेश बाबू यांनी तारीखही निश्चित केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महेश बाबू यांनी पॅन इंडिया चित्रपटासाठी 2 वर्षांच्या पूर्ण तारखा दिल्या आहेत. म्हणजेच या दरम्यान महेश बाबू इतर कोणत्याही चित्रपटात दिसणार नाहीत. त्याचबरोबर प्रेक्षकांना SSMB 29 साठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा