Mahima Chaudhry Team Lokshahi
मनोरंजन

Mahima Chaudhry : महिमा यांचे चित्रपटसृष्टीमध्ये पुनरागमन

बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी या गेल्या काही वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत.

Published by : shamal ghanekar

बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhry) या गेल्या काही वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. महिमा यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. महिमांना परदेस या चित्रपटामधून विशेष लोकप्रियता मिळाली आहे. परदेस चित्रपटामधून शाहरुख (Shah Rukh Khan) आणि महिमाच्या जोडीला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. त्या सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतात. आणि ते सोशल मिडियावर वेगवेगळ्या पोस्ट करत असतात.

प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री महिमा दिसत आहेत.

अनुपम खेर यांनी या व्हिडिओला कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'मी महिमा चौधरीला एक महिन्याआधी फोन केला होता. तेव्हा मी यूएसमध्ये होतो. माझ्या 525 व्या चित्रपटामध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी मला महिमांसोबत चर्चा करायची होती. त्यानंतर आमचे बोलणे झाले आणि तेव्हा मला समजले की, महिमाला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. महिमाचा प्रवास जगभरातील सर्व महिलांसाठी प्रेरणादायी आहे. मी तिचा हा प्रवास सर्वांसमोर आणावा अशी तिची इच्छा होती. महिमा तू माझी हिरो आहेस. मित्रांनो, तिच्यासाठी प्रार्थना करा. आता महिमा चित्रपटसृष्टीमध्ये पुनरागमन करणार आहे.'

अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला चाहत्यांनी खूप कमेंट केले आहेत. आणि अभिनेत्री महिमा यांना त्यांच्या नव्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा