मनोरंजन

अर्जुन कपूरच्या बर्थडे पार्टीत बेधुंद नाचली मलायका अरोरा; व्हिडिओ व्हायरल

अर्जुन कपूर आज त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. काल रात्री त्याने प्री-बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अर्जुन कपूर आज त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. काल रात्री त्याने प्री-बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. यात बहिणी अंशुला आणि खुशी कपूर व्यतिरिक्त त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोरा देखील पार्टीत सहभागी झाली होती. या वाढदिवसाच्या पार्टीत मलायका मनसोक्त नाचताना दिसली. याचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अर्जुन कपूरच्या घरी त्याच्या प्री-वेडिंग बर्थडे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत मलायकाने ऑफ व्हाइट गाऊन घातला असून त्यावर हार्टची डिझाईन होती. यावेळी मलायका अरोरा तिच्या प्रसिद्ध छैय्या-छैय्या गाण्यावर डान्स करताना दिसली. तर, पार्टीत उपस्थित असलेले पाहुणेही मलायकासोबत डान्स करताना दिसले.

मलायकाचा अरबाज खानसोबत २०१६ मध्ये घटस्फोट झाला. तेव्हापासून मलायका आणि अर्जुन कपूर यांच्यात अफेअर्सच्या बातम्या येत होत्या. मात्र, दोघांनीही त्यांचे नाते स्वीकारले नव्हते. त्यानंतर, 2018 मध्ये आयोजित एका फॅशन वीकमध्ये मलायका अरोरा लोकांमध्ये रॅम्पवर चालताना अर्जुन कपूरला चिअर करताना दिसली. यानंतर, अर्जुन कपूरच्या 34 व्या वाढदिवसाला मलायका अरोराने अर्जुन कपूरसोबतचा एक फोटो शेअर करून त्यांच्या नात्याची अधिकृत माहिती दिली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा