मनोरंजन

‘कोण होणार करोडपती’च्या ‘कर्मवीर विशेष’ भागामध्ये येणार मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे.

Published by : Lokshahi News

'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.संपूर्ण महाराष्ट्रातून 'कोण होणार करोडपती'ला चांगला प्रतिसाद मिळतोय. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर करत आहेत. 'कोण होणार करोडपती'मध्ये आठवड्यातून एक दिवस 'कर्मवीर विशेष' भाग असतो. येत्या कर्मवीर एपिसोडमध्ये अभिनेते मनोज वाजपेयी आणि सयाजी शिंदे दिसणार आहेत.

मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे हे गेली बरीच वर्ष एकमेकांचे मित्र आहेत आणि त्यांनी 'शूल'या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटदरम्यानच्या आठवणींना त्यांनी कोण होणार करोडपतीच्या मंचावर उजाळा दिला आहे.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणून सयाजी शिंदे. ते त्यांच्या अभिनयासोबत सामाजसेवेसाठी देखील ओळखले जातात. त्यांना आजवर अनेक समाजपयोगी कामे केली आहेत. तसेच अभिनेता मनोज वाजपेयी हा देखील बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सयाजी शिंदे आणि मनोज वाजपेयी हे कोण होणार करोडपतीच्या आगामी भागात जिंकलेली रक्कम मदत म्हणून देणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा