मनोरंजन

मनोज वाजपेयी यांची मुख्य भूमिका असलेला ‘डायल १००’ हा सिनेमा प्रदर्शित

Published by : Lokshahi News

मनोज वाजपेयी यांची मुख्य भूमिका असलेला 'डायल १००' हा सिनेमा झी 5 वर आला आहे. सध्या 'डायल १००' हा सिनेमा ट्रेंडिंगवर आहे.या नव्या सिनेमाबद्दल बोलताना मनोज म्हणाले, "खरंतर गेल्या काही वर्षांपासून मी ज्या वेबसीरीज केल्या त्याला सर्वच स्तरांतून अमाप प्रतिसाद मिळाला. म्हणून जवळपास 16 ते 19 वर्षं वयोगटातली मंडळी माझे जुने सिनेमे काढून काढून बघतायत, ही खूपच चांगली गोष्ट आहे. आता डायल 100 सिनेमावर कसा प्रतिसाद मिळतो ते कळायला आणखी थोडा वेळ जावा लागेल".

गेल्या काही वर्षांपासून केलेल्या सातत्याच्या कामगिरीमुळे अभिनेता मनोज वाजपेयी यांनी स्वत: असं स्थान निर्माण केलं आहे. मनोज वाजपेयी जवळपास 25 वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करतायत. आधी छोटा पडदा केल्यानंतर त्यांनी मोठ्या पडद्यावर एंट्री घेतली.

'डायल १००' या सिनेमात मनोज यांच्यासोबत अभिनेत्री साक्षी तन्वर, नीना गुप्ता यांनीही काम केलं आहे.या सिनेमाबद्दल बोलताना मनोज म्हणाले, "हा चित्रपट एक उत्तम लिहिलेला चित्रपट आहे. तो केवळ थ्रीलर नाही. तर त्याला इतरही कंगोरे आहेत. म्हणजे, त्याला एक फोन कॉल येतो आणि त्यानंतर तिला वाचवायला हा कॉप जात असताना, त्याच्या लक्षात येतं,की आपल्या भूतकाळामुळे आपली पत्नी आणि मुलगी अडचणीत सापडले आहेत. खरंतर या सिनेमातला नायक हा आदर्श पती वा आदर्श बाप नाही. पण त्यातून ती गोष्ट पुढे सरकत जाते".

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!

Teachers Strike : शिक्षकांची शाळा बंदची हाक, सरकारला दिला आंदोलनाचा इशारा

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Saif Ali Khan : सैफ अली खानला मोठा झटका – 15 हजार कोटींच्या मालमत्तेवर ‘शत्रू मालमत्ते’चा शिक्का