कॉमेडियन राजू श्रीवास्तव(Raju Shrivastav) हे सध्या मृत्यूशी झुंज देत असल्याचं कळतय. गुरुवारी त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. राजू यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांचे चाहते आणि सेलिब्रिटी यांमध्ये सध्या चिंतीत वातावरण निर्माण झालं आहे. राजू लवकरच बरे व्हावे यासाठी चाहते प्रार्थना देखील करत आहेत. सेलेब्स सोशल मीडियावर चाहत्यांना राजूसाठी प्रार्थना करण्यास सांगत आहेत. दरम्यान गीतकार मनोज मुंतशीर(Manoj Muntashir) यांनी राजूसाठी ट्विट केलय जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी राजू श्रीवास्तव यांना हिंमत न हारण्यास सांगितलं आहे.
राजू श्रीवास्तव यांचा फोटो शेअर करताना मनोज मुतानशिरने लिहिले की 'राजू भाई आपण धिर धरावा आम्ही आमचे हात प्रार्थनेसाठी जोडले आहेत.' मनोज मुंतशीरचे हे ट्विट चाहत्यांच्या मनाला भिडले आहे.
राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून राजू श्रीवास्तव यांची प्रकृती शुद्धीवर आलेली नाही. त्याच दिवशी त्यांची अँजिओप्लास्टीही करण्यात आली. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसून अनेकांमध्ये चिंतेचं वातावरण वाढत आहे.