Pushpa 2 Team Lokshahi
मनोरंजन

Pushpa 2 : मनोज वाजपेयींनी दिला चर्चेंला पूर्णविराम, म्हणाले अशा बातम्या कुठून आणता तुम्ही?

आता या चित्रपटाचा दुसरा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Published by : shamal ghanekar

साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा’ (Pushpa: The Rise) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटासाठी आता प्रेक्षकही उत्सुक झाले आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) मुख्य भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

मनोज वाजपेयी यांनी सुरू असलेल्या चर्चावर प्रतिक्रिया दिली आहे. 'पुष्पा 2' या चित्रपटामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका निभावणार असल्याचे ट्वीट करण्यात आले होते ,या ट्वीटला मनोज वाजपेयी यांनी मजेशीर रिप्लाय देताना म्हणाले की, 'अशा बातम्या कुठून आणता तुम्ही?' या रिप्लायवरून समजते की, ‘पुष्पा’ चित्रपटात मनोज वाजपेयी काम करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘पुष्पा: द रूल’ हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाचे शूटिंग डिसेंबर महिन्यामध्ये सुरु होणार आहे. तर 2021 मध्ये 'पुष्पा द राइज' हा चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही हिट झाला होता. पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अल्लु अर्जुन, रश्मिका मंदाना यांनी मुख भूमिका साकारली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा